चाकण-तळेगाव रस्त्यावर नेहमी गर्दी असते त्यामुळे मधल्या रस्त्यांवर वाहनांची गर्दी या रस्त्यावर वाढली आहे. त्यामुळे वाहनाचा खांबाला धक्का लागला तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रस्त्यावर विजेचा खांब झुकलेल्या अवस्थेत असून हा विजेचा खांब कोसळू शकतो दिवस रात्र वाहनाच्या वर्दळीचा रस्ता त्यात एखादी दुर्घटना झाली तर अपघात होऊन जीवित हानी होऊ शकते. महावितरण विभागाने हा विजेचा खांब तत्काळ बदलून नवीन खांब येथे उभा करावा. याकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. या विद्युत खांबापासून उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेली आहे त्यामुळे तारांना तारा लागून वाकलेल्या खांबामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा धोकादायक खांब काढण्यात यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
--
०१महाळुंगे खांब वाकला
फोटो महाळुंगे-बिरदवडी रस्त्यावर धोकादायक विजेचा खांब.