पुणे - मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून कोकण, गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे़ पुढील दोन दिवस कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून महाराष्ट्र किनारपट्टीलगतचा अरबी समुद्र खवळलेला राहील, मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे़कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला असून मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला़ मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला़ घाटमाथ्यावरील शिरगाव, ताम्हिणी १२०, दावडी ११०, कोयना (नवजा) ८०, लोणावळा, अम्बोणे, डुंगरवाडी ७० मिमी पावसाची नोंद झालीहोती़मंगळवारी दिवसभरात महाबळेश्वर ३९, सांगली ६, सातारा ५, पुणे ३, रत्नागिरी ११, गोंदिया ४२ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ १५ आॅगस्ट रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता़ १६ आॅगस्ट रोजी मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 1:23 AM