पुणे- ६ डिसेंबर नंतर देशात काहीही होऊ शकतं, पाच राज्यांच्या निवडणुका संपल्या की परिस्थिती बिघडणार आहे, असा गंभीर दावा आज वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात केला. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात महात्मा फुले यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका निशाणा साधला.
राष्ट्रवादी पक्ष आमचाच, अजित पवार गटाकडून दावा, विधिमंडळात २६० पानी उत्तर सादर
"राज्यात ६ डिसेंबर नंतर काहीही होऊ शकते अशा सूचना पोलिसांना आल्या आहेत. पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना आल्या आहेत, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. गेल्या नऊ वर्षात मुस्लिम समाजाने अत्याचार सहन केला आहे. लोकसभा निवडणुकीला चार महिने राहिले आहेत. येत्या लोकसभेला बदल नक्की होणार आहे, सरकार कोणाचे येईल सांगता येत नाही, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी नसणार आहे, असंही आंबेडकर म्हणाले.
संविधान बदलणार अशा घोषणा केल्या जातायत
देशात सध्या धार्मिक हस्तक्षेप होत आहे, आमच्या वैदिक धर्मावर आघात होत आहे, असा ज्यांनी कांगावा केला होता त्यांनी आता देशात हिंदूंचं राज्य असून देशाला हिंदूराष्ट्र करावं, संबोधित करावं, असा नवीन कांगावा केला आहे. तर दुसरीकडे देशालील संविधान बदलणार अशा घोषणा केल्या जात आहेत, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
लोकल पोलिसांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे. येत्या काही दिवसात राज्यात दंगली घडू शकतात, असं सांगितलं आहे, असंही आंबेडकर म्हणाले. प्रकाश आंबेडकर म्हणाले, छगन भुजबळ यांना तुरुंगातून मीच बाहेर काढले आहे. त्यांनी या बद्दल माझे आभार मानले नाहीत, तरीही मी नाराज नाही, असंही आंबेडकर म्हणाले.