पुणे : कोरेगाव भीमा येथील हिंसाचार घटनेत दिसते तसे सरळ चित्र नव्हते. घटनेमागे अनेक घटक काम करणारे असू शकतात.
जे मानवंदना देण्यास आले होते ते ‘बाहेरचे’ घटक होते आणि ज्यांच्या गाड्या जाळल्या, नुकसान झाले ते स्थानिक घटक होते. हे दोन घटक जरी चित्रात सातत्याने येत राहिले तरी या दोन घटकांनी हे घडवून आणले असे म्हणण्यास कमी वाव आहे. खरं तर यातलं सत्य हे आहे की, यात कुणीतरी ''तिसरा'' घटक असण्याची शक्यता आहे.काही साक्षीदारांकडून हे तिसरे घटक रेकॉर्डवर आणले आहेत.यात असे काही लोक असू शकतात जे प्रस्थापित राजयंत्रणांविरुद्ध काम करतात. लोकशाही विरोधातले हे घटक असू शकतात असे सांगत, याला काही पाठबळ देणारे पुरावे विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी आयोगासमोर अंतिम युक्तिवादादरम्यान आणले आहेत. आयोगाला अहवाल तयार करण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.