लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : विदर्भ व लगतच्या भागावर असलेले चक्रीय चक्रवात आता दक्षिण पूर्व मध्य प्रदेश व लगतच्या विदर्भावर आहे. त्यावेळी कर्नाटक किनारपट्टीपासून मराठवाड्यापर्यंत उत्तर दक्षिण कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी गारपीटीसह विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
गेल्या २४ तासात विदर्भातील वर्धा २३, कुही १४, नागपूर ९ भोपाळ १० मिमी पावसाची नोंद झाली होती. शनिवारी दिवसभरात अकोला ५ मिमी तर बुलढाणा येथे ४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे़.
राज्यावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील बहुतांश ठिकाणी ढगाळ हवामान आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात लक्षणीय घट झाली आहे.
कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात विशेषत: मराठवाड्यात पुढील तीन दिवस अनेक ठिकाणी गारपीट,मेघमर्जना, विजांच्या कडकडाटसह पावसाची शक्यता आहे.
धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, सातारा, अहमदनगर, पुणे येथे पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे़
औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली या जिल्ह्यात २१ व २२ मार्च रोजी तुरळक ठिकाणी गारपीट तसेच मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे़ तसेच सातारा, सोलापूर, नांदेड जिल्ह्यात २१ मार्च रोजी जोरदार वारे, गारपीटीसह पावसाची शक्यता आहे.