पुणे : शहरात एका खासगी कार्यक्रमासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पुण्यात शनिवारी आले. त्यावेळी शहराध्यक्षपदासाठी इच्छुक उपाध्यक्ष मुक्तार शेख, माजी आमदार रमेश बागवे यांच्या समर्थकांनी त्यांची भेट घेवून संधी देण्याची मागणी केली. त्यावेळी एक महिन्यांत शहराध्यक्षांची निवड करण्यात येणार असून, त्यासाठी दोन दिवस पुण्यात येण्याचे आश्वासन चव्हाण यांनी दिले. प्रदेशाध्यक्षपदी चव्हाण यांची निवड झाल्यानंतर शहराध्यक्ष बदलाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक इच्छुकाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामध्ये माजी आमदार रमेश बागवे, गटनेते अरविंद शिंदे, उमहापौर आबा बागुल, उपाध्यक्ष मुक्तार शेख, नगरसेवक संजय बालगुडे, माजी नगरसेवक गोपाळ तिवारी यांची नावे चर्चेत आहेत. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी महाराष्ट्रभर संपर्क दौरे सुरू केले आहेत. एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी शहराध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या समर्थकांनी त्यांची भेट घेतली. दरम्यान, शेख यांच्यानंतर रमेश बागवे यांना संधी देण्याच्या मागणीसाठी नगरसेवक अविनाश बागवे यांच्यासह कार्यकर्त्यांनी चव्हाण यांची भेट घेतली. त्यावेळी कमल व्यवहारे, चंद्रकांत छाजेड उपस्थित होते.
शहराध्यक्ष पदासाठी काँग्रेसमध्ये चढाओढ
By admin | Published: May 11, 2015 6:29 AM