शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

बारामतीतील 'या' गावचा नादच खुळा! सरपंच अन् उपसरपंच पदच घेतले सात जणांनी वाटून 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 6:20 PM

एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ल्याची कथा आपण नेहमी ऐकतो. तसेच सरपंच आणि उपसरपंचपद सात जणांनी वाटून घेतल्याचा प्रकार बारामती तालुक्यात घडला आहे.

ठळक मुद्देग्रामदैवत बुवासाहेबांच्या मंदिरात गुलाल उचलून घेतली शपथ

काटेवाडी: एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ल्याची कथा आपण नेहमी ऐकतो. तसेच सरपंच आणि उपसरपंचपद सात जणांनी वाटून घेतल्याचा प्रकार बारामती तालुक्यातील ढेकळवाडी येथे घडला आहे. महिला ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या सरपंचपदासाठी महिला सदस्यांच्या पतीराजांनी ग्रामदैवत बुवासाहेबांच्या मंदिरात गुलाल उचलून शपथ घेतल्याचा व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यामुळे ढेकळवाडी ग्रामपंचायत चर्चेत आली आहे.

ढेकळवाडी (ता. बारामती) येथील ग्रामपंचायातीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी चुरशीच्या झालेल्या लढतीमध्ये प्रस्थापितांना बाजुला सारून तरुणांना संधी मिळाली आहे. तरुणांनी मातब्बर पॅनल प्रमुखांना या निवडणुकीत अस्मान दाखविले आहे. वार्ड निहाय पॅनेल निवडणुकीत उभे केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटात ही निवडणुक चुरशी झाली होती. आता खरी चुरस सरपंच पदासाठी असून हे पद ओबीसी महिला प्रवर्ग आहे. सरच पदासाठी ११ पैकी सात जण एकत्र आले आहेत. या सात जणांनी रविवारी (दि.31)  जागृत देवस्थान बुवासाहेब यांच्या मंदिरात दोन्ही पदाचा कार्यकाल वाटून घेतला आहे. तसेच ठरल्याप्रमाणेच राजीनामे देवून त्या पदासाठी इतर सदस्यांना संधी देण्याची शपथ सुद्धा यावेळी घेण्यात आली. यामध्ये चार महिला सदस्य व तीन युवक सदस्यांचा समावेश आहे.

वार्ड क्र. १ बुवासाहेब पॅनलच्या सीमा राहूल ठोंबरे, सीमा भालेराव झारगड व राहूल ज्ञानदेव कोळेकर  वार्ड २ - हर्षल बाळासो चोपडे, वार्ड ४ - लक्ष्मी बाळासो बोरकर सुनिता संजय टकले व शुभम प्रताप ठोंबरे हे सात उमेदवारांनी परिसरातील जागृत देवस्थान बुवा साहेब येथील मंदिरात शपथ घेतली की, सरपंच पद चार माहिलांमध्ये तर उपसरपंच पदाचा कार्यकाळ तीन युवकांमध्ये वाटून घेण्याचे ठरले आहे. सरपंच व उपसरपंच पदाचा कार्यकाळ पूर्ण होताच त्यांनी राजीनामा देऊन ठरल्याप्रमाणे दुसऱ्या सदस्यांना संधी द्यायची ठरली आहे. याप्रमाणे निवडणुकी अगोदरच मंदिरात शपथ घेवून सरपंच, उपसरपंच पदाचे उमेदवार व कार्यकाल ठरला आहे. महिला सदस्याच्या पतीराजानी एकमेकांना साथ देण्याची शपथ घेतली आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीPoliticsराजकारणsarpanchसरपंचGrammy Awardsग्रॅमी पुरस्कारElectionनिवडणूक