बारामती : बारकोड स्टॅम्पचा तुटवडा निर्माण झाल्याने जिल्ह्यातील टपाल खात्याची रजिस्टर सेवा ठप्प झाली आहे. जिल्ह्यातील ९९ कार्यालयांमध्ये मागील आठ दिवसांपासून बारकोड तुटवडा आहे. त्यामुळे ग्राहकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. बारकोड शिल्लक नसल्याने टपाल कार्यालयातील रजिस्टर सेवा पूर्णपणे थांबली आहे. रजिस्टर केलेल्या टपाल पार्सल ‘ट्रॅक’ करण्यासाठी बारकोडचा ग्राहक वापर करतात. रजिस्टर केल्यानंतर ग्राहकांना बारकोडचा क्रमांक पावती दिली जाते. या पावतीचा वापर करून ग्राहक आॅनलाइन टपाल रजिस्टरद्वारे पाठविलेल्या पार्सलचा ठावठिकाणा शोधू शकतो. तसेच, पार्सल योग्य ठिकाणी पोहोचल्याची खात्री करू शकतो. खासगी सेवेच्या तुलनेने जलदगतीने ही सेवा पुरवली जाते. त्यामुळे आधुनिक असणाऱ्या बारकोड प्रणालीला ग्रहकांकडून टपाल कार्यालयांकडे मोठी मागणी आहे. (६६६.्रल्ल्िरंस्रङ्म२३.्रल्ल) या संकेतस्थळावर रजिस्टर पार्सल केलेले टपाल ग्राहक शोध घेऊ शकतात. ई-मेलच्या जमान्यातही केवळ आॅनलाइन असल्याने रजिस्टर सेवेची ग्राहकांकडून मागणी होत आहे. बारकोडच्या उपलब्धतेबाबत टपाल कर्मचाऱ्यांनादेखील माहिती नाही. त्यामुळे हा तुटवडा संपणार कधी, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. याबाबत प्रधान डाकघरचे सहायक अधीक्षक चंद्रकांत भोर यांनी ‘लोेकमत’शी बोलताना सांगितले, नाशिकवरून टपाल खात्याच्या रजिस्टर सेवेचा बारकोड स्टिकर पुरवला जातो. या स्टिकरचा काही दिवसांपासून पुरवठा झाला नाही. त्यामुळे सध्या टपाल कार्यालयांमध्ये हा तुटवडा दिसत आहे. प्रथमच हा तुटवडा निर्माण झाला आहे. शुक्रवारी (दि. ११) बारकोड स्टिकर पुणे कार्यालयात उपलब्ध झाले आहेत. शनिवारी हे बारकोड उपलब्ध होतील. त्यानंतर सेवा पूर्ववत होतील. (वार्ताहर)
पोस्टातील रजिस्टर सेवा ठप्प
By admin | Published: December 12, 2015 12:44 AM