शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

पोस्टाच्या परीक्षेला चुकांचे ‘तिकीट’

By admin | Published: May 04, 2015 3:21 AM

पोस्ट विभागाच्या मल्टिटास्किंग स्टाफ (एमटीएस) पदासाठी रविवारी झालेल्या परीक्षेत भाषांतराच्या गंभीर चुका आढळून आल्या आहेत

पुणे : पोस्ट विभागाच्या मल्टिटास्किंग स्टाफ (एमटीएस) पदासाठी रविवारी झालेल्या परीक्षेत भाषांतराच्या गंभीर चुका आढळून आल्या आहेत. काही प्रश्नांचे भाषांतर गोंधळात टाकणारे असल्याने परीक्षार्थीही संभ्रमात पडले. राज्यात ही परीक्षा होत असूनही दक्षिणेकडील एका खासगी एजन्सीला भरती प्रक्रियेचे काम देण्यात आल्याने या चुका झाल्याचे पोस्टातील एका अधिकाऱ्याने सांगितले.पोस्ट विभागामार्फत सध्या पोस्टमन, टपाल रक्षक आणि एमटीएस या पदांच्या २ हजार ४२६ जागांची भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पोस्टमन व टपाल रक्षक या पदांसाठी मागील महिन्यात परीक्षा घेण्यात आली, तर ‘एमटीएस’साठी राज्यात पुण्यासह २६ केंद्रांवर रविवारी परीक्षा झाली. लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेसाठी १०० प्रश्नांची प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली होती. त्यामध्ये सामान्य ज्ञान, गणित, इंग्रजी व प्रादेशिक भाषा, असे प्रत्येकी २५ प्रश्नांचे चार विषय होते. प्रश्नपत्रिकेतील सामान्य ज्ञान; तसेच गणित विषयासाठी इंग्रजी व मराठी असे दोन्ही भाषांतून प्रश्न दिले होते. सामान्य ज्ञान विषयातील काही इंग्रजी प्रश्नांचे मराठीत भाषांतर करताना चुका झाल्या आहेत. तसेच, प्रश्नांंना दिलेले पर्यायही चुकविले आहेत. प्रश्नपत्रिकेत ‘महानदी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी नद्या ....यात जाऊन मिळतात.’ असा प्रश्न विचारला आहे. इंग्रजी रूपात दिलेल्या चार पर्यायांमध्ये ‘इंडियन ओशन’ असा एक पर्याय आहे. याचे भाषांतर चक्क ‘हिंदू महासागर’ असे केले आहे. प्रत्यक्षात तिथे ‘हिंदू’ऐवजी ‘हिंदी’ हा शब्द असणे अपेक्षित होते, असे काही परीक्षार्थींनी ‘लोकमत’ला सांगितले.भरती प्रक्रियेचे कामकाज दक्षिणेकडील एका खासगी एजन्सीला दिले आहे. त्यामुळे भाषांतरात चुका झाल्या असाव्यात. पोस्टामार्फत ही प्रश्नपत्रिका काढण्यात आली नाही, असे पोस्टातील एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)