शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

२४ तास पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव पुढे ढकलला

By admin | Published: January 28, 2016 3:12 AM

शहराला येत्या ५ वर्षांत २४ तास एकसमान पाणीपुरवठा करण्याचा आयुक्त कुणाल कुमार यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीने एक आठवडा पुढे ढकलण्याचा

पुणे : शहराला येत्या ५ वर्षांत २४ तास एकसमान पाणीपुरवठा करण्याचा आयुक्त कुणाल कुमार यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीने एक आठवडा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत २४ तास पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाकडून सादर करण्यात आलेल्या अहवालांची एकत्रित माहिती सादर करण्यास स्थायी समितीकडून सांगण्यात आले आहे.महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी २८०० कोटी रुपये खर्च करून संपूर्ण शहराला २४ तास एकसमान पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यासाठी पाणीपटट्ीमध्ये वाढ करण्यास सांगितले आहे. बुधवारी हा विषय स्थायी समितीसमोर चर्चेला आला तेव्हा या विषयाचा अभ्यास करावयाचा असल्याने तो एक आठवडा पुढे ढकलण्याचा निर्णय स्थायी समितीच्या सदस्यांकडून घेण्यात आला, अशी माहिती स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम यांनी दिली.आयुक्तांनी स्थायी समितीसमोर सादर केलेल्या प्रस्तावामध्ये पाणीपटट्ीमध्ये ५० टक्के दरवाढ करण्याची सूचना केली आहे; तर अंदाजपत्रकामध्ये २२.५ टक्के दरवाढ सुचविण्यात आली आहे. यामुळेही संभ्रम निर्माण झाला आहे. आतापर्यंत २४ तास पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाकडून अनेक वेळा प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत, त्याचे पुढे काय झाले, याची विचारणा स्थायी समितीच्या सदस्यांकडून करण्यात आली आहे.