बारामती कृषी विज्ञान केंद्र व टेस्टीबाईट कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने देऊळगावगाडा येथे कुक्कुटपालन साहित्याचे वाटप करण्यात आले.
गरजू व बेरोजगार तरुणांनानी उद्योग धंद्यांच्या माध्यमातून आपले हात बळकट करावे व छोट्या उद्याेगातूनच पुढे मोठ्या उद्योगाची आस निर्माण होते या मागचा हेतू असून या बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने गरजू ८० लाभार्थ्यांना प्रत्येकी २५ कोंबड्या व ५० किलो खाद्य देण्यात आले आहे. त्याच बरोबर कोंबड्यांंना लागणारे लसीकरण साहित्याचे देखील यावेळी वाटप करण्यात आली असल्याची माहिती सरपंच विशाल बारवकर यांनी दिली.
यावेळी सरपंच विशाल बारवकर, उपसरपंच गणेश जाधव, अक्षय बारवकर, भाऊसाहेब शितोळे, राजवर्धन जगताप, सोमनाथ बारवकर, माऊली वाघापुरे, हिरामण पिंगळे, कृषी मित्र सचिन बारवकर, सोमनाथ जगताप, किरण बारवकर, महादेव बारवकर उपस्थित होते.
--
फोटो : २५ खोर कृषी विज्ञान केंद्र
फोटोओळ : देऊळगावगाडा (ता. दौंड) येथे कुक्कुटपालन साहित्याचे वाटप करताना विज्ञानकेंद्राचे अधिकारी.