पुणे : जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गुन्हेगारांनी पहाटे पेट्रोलचे पेटते बोळे टाकून घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला़ रस्त्यावर पार्क केलेल्या ४ दुचाकी, सीसीटीव्हीची तोडफोड करून परिसरात दहशत पसरवली़ ही घटना कोथरूडमधील शास्त्रीनगर येथील पीएमसी कॉलनीत पहाटे घडली़कोथरूड पोलिसांनी दादा कुडले व त्याचा साथीदार साळवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ एका ५५ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली आहे़ पोलिसांनी सांगितले, की कुडले याचे चुलते व या महिलेचे पूर्वी भांडण झाले होते. त्यामुळे हे दोघे पहाटे ३ वाजता पीएमसी कॉलनीत आले़ त्यांच्या हातात काठ्या होत्या़ त्यांनी प्लॅस्टिक बाटलीमध्ये पेट्रोलजन्य पदार्थ असलेले बोळे त्यांच्या घरावर फेकून आग लावली़ त्यानंतर त्यांनी बाहेर पार्क केलेल्या ४ दुचाकी वाहनांची मोडतोड केली़ तेथील सीसीटीव्हीची तोडफोड केली़ तरीही त्यांचे हे कृत्य एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे़
पेट्रोलचे बोळे फेकून घराला लावली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 5:22 AM