संपूर्ण कर्जमाफी व वीजबिल माफीचे आश्वासन दिलेले तीन पक्ष सध्या सत्तेवर आहेत. कोरोनामुळे अनेक महिने बाजारपेठा ठप्प असलेला शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडलेला असतानाच महावितरणने ( दि. १ ) फेब्रुवारीपासून शेती पंपांचा वीज पुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विहिरींमध्ये पाणी असूनही शेतातील उभी पिके करपून जाण्यास सुरुवात झाली आहे . तसेच ऊस व इतर पिकांच्या लागली खोळंबल्या आहेत. पाण्याअभावी शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने या नुकसानीस महाआघाडी सरकार जबाबदार असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. कोरोनाच्या काळात १०० युनिटपर्यंतचे वीजबिल माफ करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, हे आश्वासन न पाळता वीजबिल सक्तीने वसूल करण्याची व वीजजोडणी खंडित करण्याची मोहीम जनतेवर अन्यायकारक असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. जर शासनाने वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम थांबवली नाही तर भाजपच्या वतीने राज्यभर आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशाराही भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे.
हर्षवर्धन पाटील