शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

संशोधनामध्ये पॉवर आॅफ आयडिया महत्त्वाची : रघुनाथ माशेलकर; पुण्यात सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 1:54 PM

कोणतीही गोष्ट घडवण्यासाठी ‘पॉवर आॅफ बजेट’ नव्हे, तर ‘पॉवर आॅफ आयडिया’ सर्वाधिक महत्त्वाची असते, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी मंगळवारी व्यक्त केले.

ठळक मुद्देअनेक महत्त्वाच्या प्रसंगी मी केवळ मेंदूचे ऐकले नाही, तर हृदयाचा आवाज ऐकला : डॉ. माशेलकरपुणे विद्यापीठ सुरू करणार ‘डॉ. माशेलकर पोस्ट डॉक्टरल फेलोशिप फॉर सायन्स’ फेलोशिप

पुणे : संशोधनामध्ये निधीची कमतरता जाणवत असल्याबाबत बोलले जाते; मात्र कोणतीही गोष्ट घडवण्यासाठी ‘पॉवर आॅफ बजेट’ नव्हे, तर ‘पॉवर आॅफ आयडिया’ सर्वाधिक महत्त्वाची असते, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी मंगळवारी व्यक्त केले.डॉ. माशेलकर यांच्या अमृतमहोत्सवी (७५व्या) वाढदिवसानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आयुका, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेस (एनसीसीएस), सेंटर फॉर डेव्हलपमेंट आॅफ अ‍ॅडव्हान्स कॉम्प्युटिंग (सी-डॅक), इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ ट्रॉपिकल मेटिआॅरॉलॉजी (आयआयटीएम), आघारकर रीसर्च इन्स्टिट्यूट (एआरआय), सेंटर फॉर मटेरियल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (सी-मेट), भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) आणि कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग पुणे (सीओईपी) आदी संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी डॉ. माशेलकर यांचे पीएच.डी.चे मार्गदर्शक डॉ. एम. एम. शर्मा, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम उपस्थित होते. डॉ. माशेलकर म्हणाले, ‘‘जीवनातील अनेक महत्त्वाच्या प्रसंगी मी केवळ मेंदूचे ऐकले नाही, तर हृदयाचा आवाज ऐकला. त्यामुळे मी तरुणांना आवाहन करतो, की नेहमी हृदयाचा आवाज ऐका. अनेकदा लोक मला विचारतात, तुम्ही इतके महत्त्वाचे निर्णय कसे घेता? यावर मी सांगतो, मैने दिल की आवाज सुनी। हळदीच्या स्वामित्व हक्काचा लढा, पुण्यात ‘आयसर’च्या स्थापनेसाठी शंभर एकर जमीन देण्याचा निर्णय अशा अनेक महत्त्वाच्या निर्णयांच्या वेळी मी असेच निर्णय घेतले. त्याचा मला फायदा झाला आहे. इथे जमलेल्या तरुणांना मी सांगू इच्छितो, की तुम्ही हृदयाचा आवाज ऐका; त्यामुळे निश्चितच फरक पडेल.’’‘विद्यावाणी’चे संचालक आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. शाळिग्राम यांनी आभार मानले. 

माशेलकर यांच्या नावाने फेलोशिपसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे  ‘डॉ. माशेलकर पोस्ट डॉक्टरल फेलोशिप फॉर सायन्स’ अशी फेलोशिप सुरू करण्यात येणार असल्याचे डॉ. करमळकर यांनी या वेळी जाहीर केले. विद्यापीठाला ‘एमिनन्स’चा दर्जा मिळावा, यासाठी अशा २० फेलोशिप   सुरू करण्याचा प्रस्ताव दाखल केलेला आहे. डॉ. माशेलकर यांचे गुरू डॉ. शर्मा यांनी त्यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला.  ते म्हणाले, ‘‘माझा विद्यार्थी हा महान शास्त्रज्ञ आहेच; शिवाय त्याने विविध गुणांच्या आधारे आत्ताचे स्थान कमावले आहे. थकवा नावाची गोष्ट त्याच्या व्यक्तिमत्त्वातच नाही. ’’

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठnitin karmalkarनितीन करमळकर