पिंपळगावमध्ये विजेची रोहित्रे जळण्याच्या घटना कायम घडत असून ब्राह्मण बेट या ठिकाणी असलेले रोहित्र गेल्या चार महिन्यांत ३ वेळा जळण्याची घटना घडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पशुधनाच्या, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच महावितरणचे कर्मचारी वेळेवर फोन उचलत नाही. रात्री-अपरात्री शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. त्यामुळे गावासाठी एक निवासी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी आशा वेगवेगळ्या मागण्यांची लवकरत लवकर पूर्तता करण्यात यावी; अन्यथा ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा या वेळी सरपंच दीपक पोखरकर यांनी दिला. रोहित्रावरच्या अतिरिक्त भारांमुळे रोहित्र जळत असल्यामुळे चार अतिरिक्त रोहित्राची मागणी ग्रामस्थांचा वतीने करण्यात आली. यामध्ये ब्राम्हण बेट, कुरकुटे मळा, मधला मळा, साखरेमळा या ठिकाणी चार नवीन रोहित्रची गरज आहे.
या वेळी उपसरपंच वसंतराव राक्षे, ग्रामपंचायत सदस्य अरुण बांगर, स्वप्निल बांगर हे उपस्थित होते.