देहूगाव: देहूगावच्या गावठाण परिसरात गेल्या २४ तासांपासुन विद्यूत पुरवठा खंडीत झाला झाल्याने या परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भर पावसात पाण्याच्या एटीएमवर रांगा लावाव्या लागत आहेत. परिसरातील नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत असून त्यांनी महावितरणचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
देहूगाव गावठाण भागातील सुतार आळी, बाजारआळी या भागात भूमीगत विद्यूत वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. या भागातील विद्यूत पुरवठा मंगळवारी सकाळी ११ वाजल्या पासुन खंडीत झाला आहे. तर विठ्ठलनगर भागातही मंगळवार रात्रीपासून विद्यूत पुरवठा खंडीत होता. तो सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुरळीत झाला. मात्र तोही डीम आहे. या बाबत येथील महावितरणच्या कार्यालयात तक्रारही दिली असून येथील अधिकाऱ्यांशी चर्चा देखील करूनही अद्याप विद्यूत बुधवार दुपारी १२ वाजे पर्यंतही विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला नव्हता.
परिणामी या भागात साधारण अडीच ते तीन हजार लोकसंख्या आहे. या भागात सोसायट्या विकसित झाल्या आहेत. या परिसरात विद्यूत पुरवठा खंडीत झाल्याने या सोसायट्यांना जमिनीतील टाक्यांमधुन पाणी इमारतीवर चढवता येत नसल्याने वापराचे पाणीच नसल्याने चांगलीच तारांबळ उडाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी या भागातील नागरिकांना भर पावसातत पाण्याच्या एटीएमवर रांगा लावाव्या लागत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत असून त्यांनी महावितरणचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
या बाबत येथील शाखा अभियंता अनिल गौडा म्हणाले की, या भागात भूमीगत विद्यूत वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. या भागातील विद्यूत वाहिनी तपासली असून दोष शोधला आहे. यासाठी केबल दोष काढणाऱ्या व त्याचे जोडारी एजन्सीकडे पाठपुरावा करूनही कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने कामाला वेळ लागत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र बुधवार दुपार पर्यंत हे काम होईल असे सांगितले.