शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत महायुती अन् मविआला बंडखोरीची धास्ती; १९९५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती
2
"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?
3
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
4
भारताच्या ५ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, अयोध्येसह या ठिकाणी आपातकालीन लँडिंग, सुरक्षा यंत्रणा सतर्क  
5
'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला
6
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
7
IND vs NZ : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? टीम इंडियाला नडण्याची ताकद किवींमध्ये कधीच नाही दिसली!
8
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
9
"निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला
10
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
11
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
12
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
13
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
14
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
16
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया
17
"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
18
या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा
19
Kamran Ghulam चा शतकी नजराणा! पदार्पणात असा पराक्रम करणारा पाकचा दुसरा वयस्क बॅटर
20
'इन्फ्लुएन्सर्स' हा नवा आजार आला आहे...अभिनेत्री सीमा पाहवा भडकल्या; ही कोणाची चूक?

वीजचोरीला आळा घालणे गरजेचे

By admin | Published: July 10, 2015 1:06 AM

दौंड शहर आणि ग्रामीण भागातील वीजचोरीला आळा घालणे काळाची गरज आहे. वाढत्या वीजचोरीचा फटका शासनाला बसत आहे.

मनोहर बोडखे, दौंडदौंड शहर आणि ग्रामीण भागातील वीजचोरीला आळा घालणे काळाची गरज आहे. वाढत्या वीजचोरीचा फटका शासनाला बसत आहे. विद्युत महावितरण कंपनीने वीजचोरी प्रतिबंधक पथक कार्यरत करून हे पथक अधिक गतिमान करणे महत्त्वाचे आहे. पूर्वी ग्रामीण भागात सर्रासपणे आकडे टाकून वीजचोरी केली जात होती. त्या तुलनेत शहरातील वीजचोरी तुरळक असायची. मात्र, याउलट शहरात बहुतांशी ठिकाणी आकडे टाकून घरगुती वीज घेतली जात आहे. मात्र याचा उपद्रव वीज आकडा टाकणाऱ्या घराच्या जवळील प्रामाणिकपणे वीज वापरणाऱ्या वीज ग्राहकांना होत आहे. आकडा टाकून वीज घेत असताना बऱ्याचदा तारेला तार चिकटली जाते आणि त्यातूनच आहे तो वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे वीजचोरी करणारा आकडा टाकण्याच्या प्रयत्नात इतरांचेदेखील नुकसान करतोच. मात्र, त्याच्या परिसरातील वीज ग्राहक त्याला प्रतिबंध करायला गेले तर तो उलट ‘चोरावर मोर ’या उक्तीप्रमाणे दादागिरीची भाषा करतो. परिणामी विद्युत महावितरण कंपनीने शहरात कुठे कुठे आकडा टाकून वीज घेतली जाते. याची टेहळणी करून वीजचोरांवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. ही कारवाई करीत असताना कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता प्रामाणिकपणे कारवाई करावी, या मागणीने जोर धरला आहे.