अहमदनगर - फलटण महामार्ग क्र. १६० या रस्त्याच्या दुभाजकात विद्युत खांबा व्यवस्थित लावले नाही. सर्वच खांब जमिनीत खोलवर लावले नसल्याने कोणत्याही क्षण हे खांब पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जोराचा वारा आला तरी विद्युत खांब जागीच हलतात अशी खांबांची अवस्था शहरअंतर्गत रस्त्यावर झाली आहे. या रस्त्याचे कामकाज होऊन सहा महिने झाले नाही. मात्र, सिमेंटच्या रस्त्याला काही ठिकाणी खड्डे पडले आहे तसेच दुभाजक ठिकठिकाणी उखडून पडलेले आहे. एकंदरीतच नगरमोरी ते गोलराऊंड या रस्त्यावर काही ठिकाणी अर्धवट राहिलेले आहे. येथील समता नगर समोरील रस्त्याचे काम अर्धवट असल्याने या ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी खड्डा पडलेला आहे त्यामुळे जोराने येणारे वाहने खड्डा पडलेल्या रस्त्यावर आदळतात. काही वाहने आदळल्याने छोटे-मोठे अपघात झालेले आहे. तरी नव्याने झालेल्या या रस्त्यासंदर्भातील समस्यांवर उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
व्यापारी राहुल कटारिया म्हणाले की, दौंड शहर अंतर्गत गेलेल्या या रस्त्याचे काम निकृष्ट झालेले आहे. परिणामी नागरिकांसह वाहनचालकांना हा रस्ता धोकादायक ठरू शकतो तेव्हा शासनाने तातडीने रस्त्यावरील धोकादायक अडथळे दूर करावे अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला.
२६ दौंड
सहकारभवन जवळ रस्त्यावरील दुभाजकाचा कोसळलेला विद्युत खांब.