शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

भारत प्रश्न तडीस नेण्याचे सामर्थ्य ; आम्हाला कोणाची मध्यस्थी नको  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 8:04 PM

काश्मीरची एक इंचही जमीन पाकिस्तानला मिळू देता कामा नये. एक घाव दोन तुकडे करण्याची आता खरी वेळ आली आहे..

ठळक मुद्देलेफ्टनंट जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर 

पुणे :  पाक व्याप्त काश्मीर हा भारताचाच अविभाज्य घटक आहे. भारताच्या लष्करी सामर्थ्याच्या विरुद्ध १० पाकिस्तान उभे राहिले तरी ते बेचिराख होतील. पाक व्याप्त काश्मीरचा प्रश्न चिघळत ठेवण्यात चीनचा असणारा धूर्त हेतूही अनेकदा जगासमोर आला आहे. परंतु, काश्मीरची एक इंचही जमीन पाकिस्तानला मिळू देता कामा नये. एक घाव दोन तुकडे करण्याची आता खरी वेळ आली आहे. हा प्रश्न तडीस नेण्याचे सामर्थ्य आपल्या देशात असून, याविषयी कोणाचीच मध्यस्थी आम्हाला नको, अशा स्पष्ट शब्दांत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. दत्तात्रय शेकटकर यांनी ठणकावले.  कलम ३७० हटवून काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याने पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. सर्वार्थाने भारतापुढे कमजोर असणा-या पाकिस्तानकडून आता अणू बॉम्बच्या पोकळ धमक्या दिल्या जात आहेत. परंतु, हा विचारही त्यांच्यासाठी घातक ठरेल. त्यांनी ही चूक केल्यास त्यांचे अस्तित्व नकाशातून नष्ट होईल. पाकिस्तानचा भूभाग शोधण्यासाठी पुन्हा एखाद्या वास्को द गामाला यावं लागेल,असा शेकटकर यांनी पाकिस्तानला गर्भित इशाराही दिला.भारतीय जनता पक्षाचे सदस्य, कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांच्यातर्फे त्यांचे  ह्यकलम ३७०, काश्मीर आणि आपणह्ण या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष खासदार गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, आमदार योगेश टिळेकर, नगरसेवक अजय खेडेकर, अमोल बालवडकर, दीपक पोटे, किरण दगडे पाटील, व्हीजन नेक्स्ट फाउंडेशनचे प्रमुख डॉ. अंबरीश दरक, सामजिक कार्यकर्ते दत्ताजी गायकवाड, विनोद सातव उपस्थित होते. डॉ. शेकटकर यांनी समर्पक दाखले देत अत्यंत विस्ताराने काश्मीर विषय आपल्या व्याख्यानातून मांडला. दुसरे महायुद्ध, पाक व्याप्त काश्मीर, चीनची कटकारस्थाने, भारताची मवाळ भूमिका, फोफावलेला आंतकवाद, आर्थिक, राजकीय, सामाजिक समीकरणे अशा चौफेर संदभार्तून त्यांनी अत्यंत नेमक्या शब्दांत काश्मीर प्रश्नाचे विश्लेषण केले.बापट म्हणाले, आंतरराष्ट्रीय प्रश्नावर आजची तरुण पिढी फार अलिप्तपणे पाहत आहे याची खंत वाटते. जर या परिस्थितीत बदल झाला नाही तर आंतकवाद आपल्या दारात येईल. याचे गांभीर्य समजवण्यासाठी डॉ. शेकटकर यांनी पुस्तक लिहून हा प्रश्न घरोघरी पोहोचवावा.  

टॅग्स :PuneपुणेDattatray Shekatkarदत्तात्रय शेकटकरJammu Kashmirजम्मू-काश्मीरchinaचीनPakistanपाकिस्तान