परिवर्तन पॅनलची सत्ता मिळविली आहे. विंझर ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे प्रमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक
व माजी पंचायत समिती सदस्य संतोष दसवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनलच्या सदस्यांनी निवडणूक लढली. अमृतेश्वर पॅनलला दोन जागेवरच समाधान मानावे लागले.
वेल्हे तालुक्यात सर्वात प्रतिष्ठेची विंझर ग्रामपंचायतीची निवडणूक ठरली या निवडणुकीमध्ये विंझर ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे प्रमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक
व माजी पंचायत समिती सदस्य संतोष दसवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या नऊ जागापैकी सात जागा जिंकल्या आहेत तर अमृतेश्वर पॅनलला दोनच जागा मिळाल्या. अमृतेश्वर पॅनलचे प्रमुख विंझरचे माजी सरपंच शिवाजी भोसले यांनी केले होते. तालुक्यात विंझर गाव मध्यवर्ती ठिकाण आहे. विंझरला तालुक्याचे विद्येचे माहेरघर समजले जाते. गावात प्राथमिक शाळेपासून ते पदवीपर्यंतचे शिक्षणाची सोय आहे. तसेच तांदूळ, इतर वस्तुंची बाजारपेठदेखील वाढत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. विंझर ग्रामविकास परिवर्तन पॅनलने नऊ पैकी सात जागा जिंकुन सत्ता कायम ठेवली आहे. विंझर ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे विनायक दशरथ लिम्हण, नथु बाबुराव भुरुक, सविता मोहन दसवडकर, नुतन संतोष गायकवाड, सुनिल कृष्णा भोसले, राहुल मधुकर सागर, मोनाली सतीश लिम्हण हे विजयी झाले आहेत तर अमृतेश्वर पॅनलचे शंकुतला अशोक कारके,उषा अशोक भोसले हे दोनच सदस्य विजयी झाले आहेत.
- विंझर (ता.वेल्हे) विंझर ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे नेतृ्त्व करणारे संतोष दसवडकर व विजयी सदस्य गुलाल विरहीत आनंद साजरा करताना.