शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

नवरात्रीच्या पावन पर्वावर 'पाॅवरबाज' कामगिरी; पुण्याच्या आर्याचा दक्षिण आफ्रिकेत डंका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 1:27 PM

कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये ६९ किलो वजनी गटात १ रजत आणि ३ कांस्य पदकाची कमाई

पांडुरंग मरगजे

धनकवडी (पुणे) : नवरात्र म्हणजे महिला शक्ती जागरणोत्सव !महिलाशक्ती जेव्हा जागृत होते तेव्हा ती गगणाला गवसणी घालू शकते, याचा प्रत्यय ऐन नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वा वर धनकवडीच्या आर्या भागवतच्या 'पाॅवरबाज' विजयी कामगिरीने आला. पाॅवरवेटलिफ्टर आर्या सागर भागवतने दक्षिण आफ्रिकेत झालेल्या कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये ६९ किलो वजनी गटात १ रजत आणि ३ कांस्य पदकाची कमाई करत धनकवडीचा डंका थेट दक्षिण आफ्रिकेत दुमदुवला...

'पाॅवर लिफ्टिंग' म्हणजेच भारोत्तलन अर्थातच पुरुषांची मक्तेदारी असलेला खेळ, मात्र पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढून आर्या ने या क्षेत्रांतही आपलं नाणं खणखणीत असल्याचं दाखवून दिले आहे,.जे मोठ-मोठे खेळाडूही करू शकत नाहीत.ते या रणरागिणी नवदुर्गा ने करुन दाखवले असून समस्त धनकवडीकरांकडून ति च्या वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दक्षिण आफ्रिकेतील कॉमनवेल्थ पॉवर लिफ्टिंग चॅम्पियन शिप स्पर्धेत ६९ किलो वजनी गटात ४ पदकांची लयलूट करणारी आर्या भारताची सर्वात तरुण खेळाडू ठरली.आर्या भागवतचे वडील सागर भागवत सामाजिक कार्यकर्ते तर आई अश्विनी भागवत माजी नगरसेविका असून आर्याला त्यांची सदैव प्रेरणा असते. घरातील वातावरण सर्व सुख संपन्न असतानाही आर्या ची मात्र, खेळावर भक्ती जडली. शिक्षण घेत असतानाच अभ्यासा बरोबरच तिनं खेळाची हि आवड जोपासली. बौद्धिक क्षमते सोबतच मानसिक स्वास्थ्य आणि खेळामध्ये स्वतः ला सिध्द करण्यासाठी शारीरिक क्षमता, आत्मबल, आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी आर्याने 'पाॅवरलिफ्टिंग' या क्रीडा प्रकाराची निवड केली,

पुढे सराव करताना आर्याला सुरुवातीला ओंकार जगताप व मोनीष राजिवडे यांचे मार्गदर्शन लाभले. तर जागतिक स्तरावर स्पर्धेत आर्या ची यशस्वी वाटचालीत श्रुतिका राऊत चे योगदान महत्वपूर्ण ठरले. मातापिता आणि गुरुंच्या मार्गदर्शनामुळे आजवरचे यश मिळाले असून देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी आता आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धामध्ये उत्तम कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित केले असल्याचे आर्याने सांगितले.

टॅग्स :PuneपुणेDhankawadiधनकवडीWomenमहिलाSouth Africaद. आफ्रिकाSocialसामाजिकNavratriनवरात्री