शहरं
Join us  
Trending Stories
1
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
5
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
7
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
8
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
9
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
11
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
12
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
13
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
15
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
16
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
17
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
18
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
19
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन

Raj Thackeray: पुणे राष्ट्रवादीकडून राज ठाकरेंना 'या' महापुरुषांच्या पुस्तकांचा संच भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 9:08 PM

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत इतिहास माहिती नसताना बेलगाम वक्तव्ये केली होती

पुणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत इतिहास माहिती नसताना बेलगाम वक्तव्ये केली. त्यांना महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास आणि सौहार्द समजावे यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसने त्यांचे प्रबोधन करण्याचे ठरविले आहे. यासाठी राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे, महात्मा फुले, शरद पवार आणि गोविंद पानसरे यांची पुस्तके भेट म्हणून पाठविण्यात आली. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सिटी पोस्ट येथून टपालाद्वारे पुस्तकांचा संच राज ठाकरे यांना पाठविण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख , किशोर कांबळे,अजिंक्य पालकर, मनोज पाचपुते, रोहन पायगुडे, मंगेश मोरे, आनंद सागरे, गजानन लोंढे,निलेश वाघमारे, देवा व्हाल्लेकरआदी उपस्थित होते. 

याबाबतची भूमिका मांडताना देशमुख म्हणाले, राज ठाकरे यांना महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाची पुरेशी माहिती नाही असे त्यांच्या ठाण्यातील भाषणातून दिसून आले. वा प्रबोधकार ठाकरे यांचा वारसा सांगणाऱ्या नेत्याचा इतिहास इतका कच्चा असू शकतो हे पुन्हा कळाले. आपल्याच ज्ञाती बांधवांचं जागरण करावं, त्यांना मुख्य प्रवाहात आणावं, त्यांच्यातल्या काही चुकीच्या गोष्टी असतील तर त्यालाही दूर लोटावं, या पद्धतीनं प्रबोधनकार ठाकरे ‘प्रबोधन’ हे पत्र चालवलं. मात्र, राज ठाकरे ते विसरून धर्मांध पक्षांच्या नादी लागून महाराष्ट्राच्या सौहार्दाच्या संस्कृतीवर हल्ला करत आहेत. त्यामुळे त्यांच्या या विचारांचा वारसा तरी राज ठाकरे यांना चालवावा यासाठी त्यांच्या ज्ञानवर्धनाकरिता समग्र प्रबोधनकार ठाकरे, महात्मा फुले यांचे ‘गुलामगिरी’, गोविंद पानसरे यांचे ‘शिवाजी कोण होता?‘ आणि शरद पवार यांचे ‘लोक माझे सांगाती’  तसेच गुजराथ फाईल्स ही  पुस्तके पाठविली आहेत.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार