शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

बाँडवर लिहून देत प्रॅक्टिस! ‘ती’ महिला बोगस डॉक्टर मोकाटच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2023 10:17 AM

गुन्हा दाखल होऊन महिना उलटला तरी अजूनही पोलिसांनी अशा गंभीर प्रकरणातील आरोपी महिलेला अटक केली नाही

पुणे : गेली अनेक वर्षांपासून शहरातील विविध रुग्णालयांमध्ये एक महिला डॉक्टर म्हणून ती कार्यरत होती. डॉक्टर असल्याचे सांगूनच तिने लग्नदेखील केले. मात्र, पुणे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ‘ती’च्या विरोधात बोगस वैद्यकीय अधिकारी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर विमानतळ पोलिस ठाण्यात ११ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होऊन महिना उलटला तरी अजूनही पोलिसांनी अशा गंभीर प्रकरणातील आरोपी महिलेला अटक न केल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

चैताली सुनील बागूल (रा. सह्याद्री को-ऑप. सोसायटी, टिटवाळा पूर्व, मुंबई) असे बोगस डॉक्टर म्हणून पुण्यासह नाशिक आणि मुंबई येथे काम केलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याविरोधात पुणे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती घनवट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चैताली बागूल हिने पुण्यातील इंदिरा आयव्हीएफ, जीवनज्योत हॉस्पिटल आणि श्री हॉस्पिटल या तीन रुग्णालयांमध्ये डॉक्टरकीची (बीएचएमएस) कोणतीही पदवी नसताना वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले होते. १४ जुलै रोजी प्रथमेश मकरंद पवार यांनी महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रारी अर्ज केला होता. या तक्रारी अर्जाच्या पडताळणीमध्ये चैताली बागूल ही महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीच्या पत्रानुसार ती कुठेही वैद्यकीय व्यवसाय करताना आढळली तर तिच्यावर त्वरित फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे पत्रदेखील होते.यानंतर फिर्यादी डॉ. घनवट यांनी चैताली बागूल ज्या रुग्णालयांमध्ये काम करत होती, तेथे जाऊन विचारणा केली असता संबंधित रुग्णालयामध्ये ती आता कार्यरत नसल्याचे सांगण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाची माहिती महापालिकेचे आरोग्याधिकारी यांनी महापालिकेच्या विधि अधिकाऱ्यांना दिली असता, त्यांनी चैताली बागूल हिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा अभिप्राय दिल्यानंतर विमानतळ पोलिस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

डॉक्टर असल्याचे सांगत केले लग्न

दरम्यानच्या काळात चैताली बागूल हिने स्वत: डॉक्टर असल्याचे सांगत, एका नामवंत डॉक्टरशी लग्नदेखील केले. लग्नानंतर मुलासह त्यांच्या घरात सगळ्यांना ही बोगस डॉक्टर असल्याचे समजले. त्यामुळे चैताली सध्या डॉक्टर नवऱ्यापासून विभक्त राहत असून, अशा प्रकारे फसवणूक करणे ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे मतदेखील डॉक्टर मुलाच्या नातेवाइकांनी व्यक्त केले.

बॉण्ड पेपरवर लिहून द्यायची..

चैताली बागूल हिने ज्या-ज्या रुग्णालयांत काम केले तिथे तिला वैद्यकीय प्रमाणपत्राबद्दल विचारणा केली जायची. त्यामुळे ती चार ते पाच महिनेच एखाद्या रुग्णालयात काम करायची. तसेच, सुरुवातील वैद्यकीय प्रमाणपत्र गावी आहे, असे सांगून तोपर्यंत बॉण्ड पेपरवर लिहून देत ती काही काळ नोकरी करायची, अशी माहितीदेखील समोर आली आहे.

अद्याप अटक नाही

बोगस महिला डॉक्टर चैताली बागूल ही केवळ १२वी उत्तीर्ण आहे. तिच्यावर गुन्हा दाखल होऊन आज महिना उलटला. ती सध्या मुंबईत राहत असून, सर्वत्र अजूनही डॉक्टर म्हणूनच वावरत असल्याची माहिती तिच्या सासरच्या लोकांनी दिली. मात्र, विमानतळ पोलिसांनी सगळे पुरावे असतानादेखील, एवढ्या गंभीर प्रकरणातील आरोपीला अजूनही अटक का केली नाही, असा सवालदेखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

 

 

 

 

 

टॅग्स :Puneपुणेdoctorडॉक्टरHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलPoliceपोलिस