मुंबई/पुणे - सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यामध्ये १९ वर्षांचा मुलगा रात्री उशिरा धावताना दिसत आहे. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या मुलाचे नाव प्रदीप मेहरा (Pradeep Mehra) असं आहे. तसेच तो मूळचा उत्तराखंडचा रहिवाशी असून आर्थिक संकटामुळे प्रदीप नोएडा येथील मॅकडोनाल्डमध्ये काम करतो. सैन्य दलात भरती होण्याची त्याची इच्छा आहे. त्यासाठी तो मोठे कष्टही घेत आहे. कामावरुन सुटल्यानंतर तो 10 किमी धावत आपल्या घरी पोहोचतो. या व्हायरल प्रदीप मेहराच्या फोटोवरुन पुणे पोलिसांनी भन्नाट क्रिएटीव्ह ट्विट केलं आहे.
व्हायरल व्हिडिओतील प्रदीपला कारचालकाने दिलेली लिफ्ट तो नाकारतो. तसेच, आपल्या धेय्यासाठी मार्गक्रमण करतो. त्यावरुनच, पुणे पोलिसांच्या साबयर विभागाने भन्नाट मिम्स बनवले आहे. तुम्हालाही अशाचप्रकारे कुणीतरी ओटीपी मागेल, पण तुम्ही सुरक्षितपणे पुढे मार्गक्रम करत राहायचं. म्हणजेच, कोणालाही आपला ओटीपी द्यायचा नाही, कोणाच्याही गाडीत बसून स्वत:ची फसवणूक करुन घ्यायाची नाही, असे पुणे पोलिसांनी सूचवले आहे.
काय आहे व्हायरल व्हिडीओत?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा रात्री उशिरा घराकडे धावत जात असल्याचं दिसत आहे. याच दरम्यान, विनोद कापरी हे त्याला आपल्या गाडीतून घरी सोडण्यीच ऑफर देतात. परंतु ते तो नाकारतो. त्यानंतर तो आपण मॅकडोनाल्डमध्ये काम करत असून शिफ्ट संपल्यानंतर घरी जात असल्याचंही सांगतो. आपलं नाव प्रदीप असल्याचं सांगतो उत्तराखंडच्या अल्मोडा येथील रहिवासी असल्याचंही त्यानं सांगितलं. तसंच आपण लष्करात जाण्यासाठी तयारी करत असून धावण्याचा सराव करण्यासाठी वेळ मिळत नाही, त्यामुळे सवय होण्यासाठी शिफ्ट संपवून घरी जाताना धावत घरी जात असल्याचंही तो सांगताना दिसत आहे.