पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या लेखा कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी प्रकाश जामदार यांची निवड करण्यात आली आहे. तर कार्याध्यक्षपदी योगेश नांदखिले तसेच सचिवपदी जितेंद्र चासकर यांचीही निवड करण्यात आली.
पुणे जिल्हा परिषदेमध्ये लेखा कर्मचारी संघटनेची सभा शरदचंद्र सभागृहात पार पडली. या वेळी ही निवड केली आहे. कोषाध्यक्षपदी प्रमोद निगडे, उपाध्यक्ष अरुण दराडे, गुलचंद गायकवाड, निर्मला रहातेकर, युन्नीस सय्यद, सहसचिव सुनील जाधव, सहकोषाध्यक्ष संदीप शिंदे, संघटक प्रशांत सुतार, किशोर कांबळे, किशोर गाडेकर, गणेश कुंभार, प्रसिद्धिप्रमुख म्हणून नीलेश सोनवणे यांची तर सल्लागार म्हणून संजय कांबळे आणि सुभाष झणझणे यांची निवड केली आहे़. सेवानिवृत्त लेखाधिकारी कडू यांच्या अध्यक्षतेखाली व सेवानिवृत्त सहायक लेखाधिकारी सुब्राव माने, राज्य कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रशांत सुतार व किशोर कांबळे यांच्या उपस्थितीत सभा आयोजित केली होती.
फोटो : १) प्रकाश जामदार
२) जितेंद्र चासकर