पुणे- ‘ मुक्तछंद’ या सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणार्या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा ‘स्व. प्रमोद महाजन स्मृति पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि ‘तीन तलाक’ साठी यशस्वी लढा देणार्या शायरा बानो यांना देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी दिली आहे.केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते येत्या रविवारी दि. २९ आॅक्टोबर रोजी दुपारी ४.३० वाजता कोथरुडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. खासदार अनिल शिरोळे, खासदार पूनम महाजन, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
अनुपम खेर, शायरा बानो यांना प्रमोद महाजन पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 3:12 PM
‘स्व. प्रमोद महाजन स्मृति पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि ‘तीन तलाक’ साठी यशस्वी लढा देणार्या शायरा बानो यांना जाहीर झाला आहे.
ठळक मुद्देचित्रपट आणि कला क्षेत्रासाठी अनुपम खेर यांचे बहुमूल्य योगदान ‘तीन तलाक’ ही घटस्फोटाची पध्दत घटनाबाह्य ठरवावी यासाठी शायरा बानो यांचा यशस्वी लढा