पुणे : मुसळधार पाऊस व पुरामुळे प्रचंड वित्त व जीवितहानी सोसावी लागलेल्या केरळमध्ये विविध संस्थांमार्फत बचाव कार्य सुरू आहे. यात एनडीआरएफ, सामाजिक संस्था तसेच प्रामुख्याने लष्करी जवान सर्वाधिक मदतकार्यात पुढे आहे. या मदत कार्यादरम्यान लष्कराच्या दक्षिण कमांडच्या जवानांनी पूरग्रस्तांना राहत तसेच मदत देत जवळपास १२ हजार ५०० नागरिकांना आतापर्यंत सुखरूप बाहेर काढले आहे. या सोबतच रस्ते आणि पुलांची कामे करून दळणवळण पुन्हा सुरळीत करण्याचा प्रयत्न लष्करातर्फे करण्यात येत आहे.प्रचंड पुरामुळे केरळमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावे पाण्याखाली गेल्याने लाखो नागरिक बेघर झाले आहेत. या पुरामुळे जवळपास ३०० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला तर लाखो लोक बेघर झाले आहेत. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी एनडीआरएफ, लष्कर, सामाजिक संस्था एकवटल्या आहेत. आतापर्यंत लाखो बाधितांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. लष्कराचे जवान बचावकार्यात सर्वाधिक पुढे आहेत. जवानांचे बचावकार्याचे व्हिडीओ सोशल नेटवर्किंग साईटवर व्हायरल होत आहेत. या बचावकार्यात लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे जवान आघाडीवर आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ७० टीम तसेच १३ टास्क फोर्सद्वारे बचावकार्य सुरू आहे. या बरोबरच रस्तेबांधणी आणि पुलबांधणीही या जवानांनी हाती घेतली आहे. आतापर्यंत जवळपास १२ हजार ५०० लोकांना दक्षिण मुख्यालयाच्या जवानांनी वाचविले आहे.आतापर्यंत अंदाजे २६ पुलांचे तात्पुरत्या स्वरूपात बांधकाम करण्यात आले आहे. तसेच ५० रस्त्यांची दुरूस्ती करण्यात आली आहे. हे रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहे. यामुळे बचावकार्य आणखी वेगाने करणे शक्य होत आहे. दक्षिण मुख्यालयाचे कमांडन्ट लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी यांनी पूरग्रस्त परिसराची पाहणी केली. तसेच जवानांच्या कार्याचे कौतुक केले.२६ पुलांचे तात्पुरत्या स्वरूपात बांधकामलष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या ७० बचावपथक तसेच १३ इंजिनियरच्या विशेष टास्क फोर्स केरळमध्ये बचावकार्य राबवित आहेत. यात डॉक्टरांच्या पथकाचाही समावेश आहे.हे पथक येथील आरोग्यसेवा सुरळीत ठेवण्यासाठी कार्य करत आहे. आतापर्यंत अंदाजे २६ पुलांचे तात्पुरत्या स्वरूपात बांधकाम करण्यात आले आहे. तसेच ५० रस्त्यांची दुरूस्ती करण्यात आली आहे.ज्या परिसरात हेलिकॉप्टरद्वारे पोहोचनेही कठीण आहे, अशा परिसरात जवनांनी जाऊन मदतकार्य राबविले आहे. या जवानांचा मला अभिमान आहे, हे बचावकार्य आम्ही सुरूच ठेवणार आहोत. स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने जास्तीत जास्त मदत करण्यात येईल. या बचावकार्यात इतरही अनेक सामाजिक संस्था सहभागी झाल्या आहेत. त्यांचे कार्यही कौतुकास्पद आहे. - डी. आर. सोनी,आर्मी कमांडन्ट, दक्षिण मुख्यालय
पूरग्रस्तांचे वाचविले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 4:06 AM