रांजणगाव गणपती: येथील रांजणगाव एमआयडीसीत कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी भेट देत सेंटरच्या सुविधेचा आढावा घेतला. या वेळी आंबेगाव शिरूर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे, युवा उद्योजक अनिल दुंडे, डॉ.स्नेहा ढमढेरे, डॉ. सरोदे, आनंद शिंदे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सध्या या कोविड केअर सेंटरमध्ये ६० कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. या वेळी मानसिंग पाचुंदकर पाटील यांनीही कोरोनाबाधितांची विचारपूस करत त्यांना धीर दिला. या कोविड सेंटरला सर्व आरोग्य सुविधा पुरविण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड केअर सेंटरला आवश्यक त्या आरोग्य सुविधा आणि आवश्यक ती सर्व मदत देण्यात येणार असल्याचे पाचुंदकर यांनी यावेळी सांगितले.
१२ रांजणगाव गणपती
रांजणगाव एमआयडीसीतील कोविड केअर सेंटरची पाहणी मानसिंग पाचुंदकर, संतोषकुमार देशमुख यांनी केली.