पुणे -
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी आंदोलन केले. कोविडच्या पार्श्वभूमीवर एका ठिकाणी सामान्य जनतेला एक न्याय आणि सत्ताधाऱ्यांना दुसरा न्याय, अशा पद्धतीचे चित्र शुक्रवारी पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी पाहायला मिळाले. यावेळेस हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम मोडले गेले. हा कार्यक्रम प्रशांत जगताप यांनी आयोजिला होता.
पुणेकरांच्या जिवाशी असा खेळ खपवून घेणार नाही, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव, सर्वजीत बनसोड, पुणे शहर अध्यक्ष मूनववर कुरेशी, कार्याध्यक्ष प्रफुल गुजर, महासचिव ॲड. अरविंद तायडे, प्रवक्ते गौरव जाधव, उपाध्यक्ष प्रवीण गायकवाड,सहसंघटक विनोद शिंदे, सदस्य निरंजन कांबळे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
-----
प्रमुख मागण्या
-प्रशांत जगताप व अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा
- अजित पवारांना व आयोजक तसेच पदाधिकाऱ्यांना १५ दिवस होम क्वारंटाइन करावे