राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी कोरोनाच्या संकटकाळात दिसलेच नाहीत, हे पुणेकरांनी बघितले आहे. किंबहुना चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आवाहनानंतर पालकमंत्री महोदयांना जाग आली आणि त्यांनी पुण्यात बैठका घ्यायला सुरुवात केली. खरेतर महामारीच्या काळात सर्व जबाबदारी ही राज्य सरकारची व प्रशासनाची असते याचा बहुधा त्यांना विसर पडला असावा.
सुरू असलेले सेवा कार्य
सौम्य लक्षणे असणाऱ्या ३०० बाधितांना मोफत वैद्यकीय सल्ला आणि औषधोपचाराची व्यवस्था, बाधितांवर उपचारासाठी संजीवनी रुग्णालय येथे स्वखर्चातून ४० ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था, विवेक व्यासपीठ, रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातून गरवारे महाविद्यालय येथे ६० ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था करत आहे. दोन वेळचे मोफत जेवण पुरवले जात असून, दुपारी व रात्री मिळून रोज ६०० डबे वाटप केले जात आहे. बाणेरमध्ये कोविड सेंटर अद्यायावतसाठी आमदार निधीतून एक कोटी, तर शहर भाजपच्या माध्यमातून आतापर्यंत सहा हजार बॉटल्स रक्त संकलन केले. बाधितांची संख्या पुण्यात वाढत असताना रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाला. रेमडेसिविर मिळवताना अनेक रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी दमछाक होत होती. रेमडेसिविरसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना किमान एक डोस स्वखर्चातून उपलब्ध करून दिला. कोथरूडमध्ये प्लाझ्मादानचा उपक्रम राबवून २०० पेक्षा जास्त प्लाझ्मादान केले.