प्रविण गायकवाड यांचा मुंबईत काँग्रेस प्रवेश ; राज्यभरातून असंख्य कार्यकर्ते उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 01:49 PM2019-03-30T13:49:54+5:302019-03-30T17:16:51+5:30

लोकसभेच्या पुणे जागेसाठी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, प्रवीण गायकवाड काँगेसच्या तिकीटावर पुण्यात निवडणुक लढण्यास इच्छुक आहे.

Praveen Gaikwad in Mumbai for congress entry | प्रविण गायकवाड यांचा मुंबईत काँग्रेस प्रवेश ; राज्यभरातून असंख्य कार्यकर्ते उपस्थित

प्रविण गायकवाड यांचा मुंबईत काँग्रेस प्रवेश ; राज्यभरातून असंख्य कार्यकर्ते उपस्थित

googlenewsNext
ठळक मुद्देटिळक भवनमधे काँग्रेसची बैठक सुरु , राज्यभरातील शेकडो कार्यकर्त्यासह मुंबईत दाखल

पुणे : लोकसभेच्या पुणे जागेसाठी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, प्रवीण गायकवाड काँगेसच्या तिकीटावर पुण्यात निवडणुक लढण्यास इच्छुक आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यभरातील शेकडो कार्यकर्त्यासह टिळक भवनमध्ये झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत गायकवाड यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते. 

काँग्रेसच्या बैठकीनंतर अशोक चव्हाण म्हणाले, राष्ट्रवादीकडून काँग्रेसला रावेरची जागा सोडण्यात आली होती. त्याठिकाणी पक्षाचा उमेदवार म्हणून उल्हास पाटील यांची घोषणा केली . मात्र , पुण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असून तो संध्याकाळपर्यंत जाहीर होईल असे म्हणत या जागेबाबत सस्पेन्स कायम ठेवला.  
गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसचा घोळ सुरु आहे. या जागेसाठी काँग्रेस पक्षातून देखील इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. काल तर लोककलावंत सुरेखा पुणेकरांचे नावही देखील चर्चेत आले होते. मात्र, शुक्रवारी दिल्ली आणि पुण्यात घडलेल्या वेगवान घडामोडीनंतर गायकवाड यांचे मागे पडलेले नाव पुन्हा पुढे आले . लोकसभेच्या उमेदवारीचा मनसुबा ठेवत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईला दाखल झाले. यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते. 

मागील काही दिवसांपासून पुण्यातील उमेदवारीबाबत दिल्ली दरबारी चर्चा सुरू आहे. सुरूवातीला गायकवाड यांनी उमेदवारीबाबत इच्छा व्यक्त करून दिल्लीवारीही केली. पण विरोध झाल्याने त्यांचे नाव मागे पडले. मोहन जोशी, शिंदे यांचीच नावे स्पर्धेत असल्याचे चित्र निर्माण झाले. बुधवारी शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा रंगली. पण दोन दिवसांच्या खंडानंतर पुन्हा गायकवाड यांचे नाव स्पर्धेत आल्याची चर्चा आहे. शुक्रवारी दुपारी त्यांनी काँग्रेस भवनमध्ये येऊन शहराध्यक्ष रमेश बागवे यांची भेट घेतली. काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

त्यानंतर लोकमत शी बोलताना गायकवाड म्हणाले, मी काँग्रेससोबत काम करायचे ठरविले आहे. लोकसभेचे तिकीट हा माझ्यादृष्टीने महत्वाची विषय नव्हता आणि नाही. परंतु, महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजातील माझ्या पाठीराख्यांना वाटते की, आपल्या माणसाला तिकीट मिळालाय हवे. ते मिळाले तर त्याचा फायदा राज्यभरात होईल. नेतेमंडळी काही कारणांमुळे बाहेर असल्याने पक्ष प्रवेशाची प्रक्रिया लांबली होती. आता शनिवारी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे, सोनल पटेल, इतर नेत्यांच्या उपस्थितीत प्राथमिक सदस्यत्व व पक्ष प्रवेश करण्याचे नियोजन आहे. 

Web Title: Praveen Gaikwad in Mumbai for congress entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.