शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

रोहित पवार अजून लहान आहे, त्यांनी स्वतःच्या घरातील परिस्थिती पाहावी - प्रविण दरेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2022 5:32 PM

पंकजा मुंडेंच्या प्रश्नावर काय म्हणाले दरेकर?...

पुणे : 'गोपीनाथ मुंडे जर आज हयात असले असते तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते असे बोलण्याऐवजी रोहित पवारांनी स्वतःच्या घरातील परिस्थिती पाहावी', असं म्हणत भाजप नेते प्रविण दरेकर यांनी रोहित पवारांना टोला लगावला आहे. दरेकरांनी पुण्यात बोलताना रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, रोहित पवारांनी आधी त्यांच्या घरातील अजित पवार, सुप्रिया सुळे की ते स्वतः मुख्यमंत्री होणार, यावर एकमत करा आणि मग हयात नसलेल्यांशिषयी बोलावे, असा टोलाही लगावलाय.

'रोहित पवारांनी अजित पवारांचं ऐकलं पाहिजे'

पुढे बोलताना दरेकरांनी रोहित पवारांना खोचक टोलाही लगावला. ते म्हणाले, रोहित पवार अजून लहान आहेत. उगीच वाद निर्माण करू नये, असं अजित पवार नेहमी सांगतात ते त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. सध्या राज्यात विरोधक आणि सत्ताधारी वारंवार समोरासमोर येताना दिसत आहे.

पंकजा मुंडेंच्या प्रश्नावर काय म्हणाले दरेकर?

'पंकजा मुंडे आमच्या राष्ट्रीय नेत्या आहेत. जिथे जिथे त्या गेल्या आहेत, तिथे त्यांनी संधीच सोनं करुन दाखवलं आहे. त्या मध्य प्रदेशच्या प्रभारी आहेत तिथे त्यांनी चांगलं संघटन केलं आहे, असंही दरेकर म्हणाले. राज्यसभेच्या उमेदवारीबद्दल विचारले असता दरेकर म्हणाले, हा निर्णय वरिष्ठ घेत असतात  मोठ्या नेत्यांवर बोलणं उचित नाही.

महागाईवर काय म्हणाले दरेकर?

सध्या केंद्र सरकार उत्तम काम करत आहे. सरकारने महागाईवर पूर्णपणे नियंत्रण आणले आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीही आटोक्यात आणण्यात केंद्राला यश आले आहे. राज्य सरकारने सेस कमी करून महागाई अजून कमी करण्यात मदत केली पाहिजे, असंही दरेकर यावेळी म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडpravin darekarप्रवीण दरेकरAjit Pawarअजित पवारRohit Pawarरोहित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेGopinath Mundeगोपीनाथ मुंडे