अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदासाठी साई चरणी प्रार्थना; बारामतीत ते शिर्डी पायी चालत पालखी सोहळा रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 11:49 AM2024-11-29T11:49:18+5:302024-11-29T11:51:05+5:30
या वर्षी अजित पवार मुख्यमंत्री व्याहवेत या विचाराने पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
बारामती - राज्यात सत्तास्थापनेसाठी मुख्यमंत्री पदासाठी महायुतीमध्ये दिल्ली दरबारी बैठकांचे सत्र सुरुच आहे. त्यातच अजित पवार यांना मुख्यमंत्री पद मिळावे. यासाठी साइबाबांच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी बारामती ते शिर्डी पालखी सोहळा मार्गस्थ झाला आहे. माजी उपनगराध्यक्ष बिरजु मांढरे यांच्या पुढकारातून हा साेहळा आयोजित करण्यात आला आहे. बारामतीच्या विकासात अजित पवार यांचे महत्वपुर्ण योगदान आहे.पवार यांना राज्याचे मुख्यमंत्री होण्याची संधी मिळावी या विचाराने २०२४ चा पालखी सोहळा साईबाबा च्या चरणी प्रार्थना करण्यासाठी गुरुवारी( दि.२८ नोव्हेंबर) बारामती हुन शिर्डी कडे प्रस्थान केले.
बारामती ते शिर्डी असा पायी पालखी सोहळा साईच्छा सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष ,बारामती नगरपरिषद चे माजी उप नगराध्यक्ष बिरजू मांढरे याच्या माध्यमातून दरवर्षी आयोजित करण्यात येत असतो. या वर्षी अजित पवार मुख्यमंत्री व्याहवेत या विचाराने पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी माजी नगराध्यक्षा भारती मूथा,मुख्यधिकारी महेश रोकडे,ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर,अभिजित जाधव,अभिजित चव्हाण, सुधीर पानसरे व अविनाश बांदल,डॉ सौरभ मूथा, दिनेश जगताप, शब्बीर शेख, शिर्डी चे मदन मोकाटे, जालिंदर सोनवणे,रमेश सोनवणे, तुषार थेटे, मंगेश चौधरी,मातंग एकता आंदोलन चे राजेंद्र मांढरे आदी उपस्तीत होते. १३ वर्षा पासून सदर पालखी सोहळा करत असताना व्यसन मुक्ती,सार्वजनिक वाचनालय,गुणवंत विद्यार्थी गौरव,स्पर्धा परीक्षा साठी सहकार्य आदी उपक्रम पालखी सोहळ्यास जोडीला घेत असतो. या वर्षी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत हा संकल्प पूर्ण व्हावा म्हणून हजारो भक्तासमवेत साई चरणी प्रार्थना करणार असल्याचे आयोजक माजी. उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांनी सांगितले.
शहरातील डॉ आंबेडकर वसाहत चे रुपडे पालटले आहे. त्या मध्ये साई विचारांचा प्रभाव आहे परिसरात साई भक्त वाढल्याने अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर इमारत उभी राहिली.हि इमारत बारामती च्या वैभवात भर घालत असल्याचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी सांगितले.अध्यात्म व विकास कामे करत असताना बिरजू मांढरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी इतिहास नोंद घेईल इतके उपक्रम राबविले. तालुक्यात सर्वप्रथम साई बाबा पालखी सोहळा सुरू करण्याचा मान पटकाविला असल्याचे भारती मूथा यांनी सांगितले.या प्रसंगी पालखी सोहळ्यात वासुदेव ची भूमिका करणारे राजेंद्र साळुंखे, पुजारी हरिभाऊ केदारी,हरीभाऊ गोंडे यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.