शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदासाठी साई चरणी प्रार्थना; बारामतीत ते शिर्डी पायी चालत पालखी सोहळा रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 11:51 IST

या वर्षी अजित पवार मुख्यमंत्री व्याहवेत या विचाराने पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

बारामती - राज्यात सत्तास्थापनेसाठी मुख्यमंत्री पदासाठी महायुतीमध्ये दिल्ली दरबारी बैठकांचे सत्र सुरुच आहे. त्यातच अजित पवार यांना मुख्यमंत्री पद मिळावे. यासाठी साइबाबांच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी बारामती ते शिर्डी पालखी सोहळा मार्गस्थ झाला आहे. माजी उपनगराध्यक्ष  बिरजु मांढरे यांच्या पुढकारातून हा साेहळा आयोजित करण्यात आला आहे. बारामतीच्या विकासात अजित पवार यांचे महत्वपुर्ण योगदान आहे.पवार यांना राज्याचे मुख्यमंत्री होण्याची संधी मिळावी या विचाराने २०२४ चा पालखी सोहळा साईबाबा च्या चरणी प्रार्थना करण्यासाठी गुरुवारी( दि.२८ नोव्हेंबर) बारामती हुन शिर्डी कडे प्रस्थान केले.बारामती ते शिर्डी असा पायी पालखी सोहळा साईच्छा सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष ,बारामती नगरपरिषद चे माजी उप नगराध्यक्ष बिरजू मांढरे याच्या माध्यमातून दरवर्षी आयोजित करण्यात येत असतो. या वर्षी अजित पवार मुख्यमंत्री व्याहवेत या विचाराने पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी माजी नगराध्यक्षा भारती मूथा,मुख्यधिकारी महेश रोकडे,ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर,अभिजित जाधव,अभिजित चव्हाण, सुधीर पानसरे व अविनाश बांदल,डॉ सौरभ मूथा, दिनेश जगताप, शब्बीर शेख, शिर्डी चे मदन मोकाटे, जालिंदर सोनवणे,रमेश सोनवणे, तुषार थेटे, मंगेश चौधरी,मातंग एकता आंदोलन चे राजेंद्र मांढरे आदी  उपस्तीत होते. १३ वर्षा पासून सदर पालखी सोहळा करत असताना व्यसन मुक्ती,सार्वजनिक वाचनालय,गुणवंत विद्यार्थी गौरव,स्पर्धा परीक्षा साठी सहकार्य आदी उपक्रम पालखी सोहळ्यास जोडीला घेत असतो. या वर्षी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत हा संकल्प पूर्ण व्हावा म्हणून हजारो भक्तासमवेत साई चरणी प्रार्थना करणार असल्याचे आयोजक माजी. उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांनी सांगितले.शहरातील डॉ आंबेडकर वसाहत चे रुपडे पालटले आहे. त्या मध्ये साई विचारांचा प्रभाव आहे परिसरात साई भक्त वाढल्याने अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर इमारत उभी राहिली.हि इमारत  बारामती च्या वैभवात भर घालत असल्याचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी सांगितले.अध्यात्म व विकास कामे करत असताना बिरजू मांढरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी इतिहास नोंद घेईल इतके उपक्रम राबविले. तालुक्यात सर्वप्रथम साई बाबा पालखी सोहळा सुरू करण्याचा मान पटकाविला असल्याचे भारती मूथा यांनी सांगितले.या प्रसंगी पालखी सोहळ्यात वासुदेव ची भूमिका करणारे राजेंद्र साळुंखे, पुजारी हरिभाऊ केदारी,हरीभाऊ गोंडे यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Ajit Pawarअजित पवारshirdiशिर्डीSharad Pawarशरद पवार