हिंजवडी : येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये कर्वे समाजसेवी संस्था, रोटरी क्लब पुणे वेस्ट आणि ऊर्मी सामाजिक संस्था यांच्या वतीने १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी विवाहपूर्व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जोडीदाराविषयी अपेक्षा, नाती, जोडीदार निवडीचे निकष, कर्तव्य, स्वत:चे गुणदोष, छंद या विषयीची माहिती मानस मित्र सल्ला केंद्राच्या संचालिका भारती पेंडसे व मानसोपचारतज्ज्ञ मधुराणी देशमुख यांनी दिली. या प्रसंगी रोटरी क्लब आॅफ पुणे वेस्टच्या रोटरीयन भाग्यश्री भिड , अनुराधा सप्रे, वैशाली बखले, माधुरी घाटे, बिपिन घाटे, ‘ऊर्मी’चे राहुल शेंडे उपस्थित होते. नियोजन प्राचार्या एस. एन. गाढवे पर्यवेक्षक व पी. के. पवार यांनी केले. (वार्ताहर)
हिंजवडीत विद्यार्थ्यांना विवाहपूर्व मार्गदर्शन
By admin | Published: October 12, 2016 2:00 AM