पुणे : कामाच्या ठिकाणी बेशिस्त वर्तन आणि सातत्याने गैरहजर राहणा-या पुणे महानगर परिवहन महामंडळातील तब्बल पावणे चारशे कर्मचा-यांवर निलंबनाची टांगती तलवार आहे. पुढील काही दिवसांत पीएमपी प्रशासनाकडून या कर्मचा-यांना निलंबित केले जाणार असल्याचे समजते.पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी बेशिस्त वर्तन करणा-या कर्मचाºयांसह अधिकाºयांवरही दंडात्मक तसेच निलंबनाची कारवाई सुरू ठेवली आहे. आतापर्यंत सुमारे २०० जणांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. १०० कर्मचाºयांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ३७७ कर्मचाºयांचा समावेश असून त्यांची सध्या चौकशी सुरू आहे. सातत्याने गैरहजर राहणे, बेशिस्त वर्तन करणे तसेच इतर मुद्यांच्याआधारे त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.महिन्यात २१ दिवस कामावर हजर राहणे बंधनकारक आहे. मात्र गेल्या पाच, सहा महिन्यांपासून या कर्मचाºयांचे हजेरी पाहण्यात आली.
बेशिस्त वर्तन आणि सातत्याने गैरहजर राहणा-या पीएमपीच्या ३७७ कर्मचा-यांवर टांगती तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 2:43 AM