पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेकरिता पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्राधान्याने लसीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याकरिता आज (बुधवार दि. २८) मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयात सकाळी १० ते ५ या वेळेत लसीकरण केले जाणार आहे़
यूपीएससीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार यूपीएससीची पूर्वपरीक्षा १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यामुळे पुण्यातील विद्यार्थी दिल्लीला जाणार असल्याने त्यांची तेथे कोणतीही अडचण निर्माण होऊ नये. यासाठी महापालिकेने कमला नेहरू रुग्णालयात बुधवारी सकाळी १०.०० ते सांयकाळी ५ या वेळेत लसीकरण मोहीम घेतली असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे़
दरम्यान आज केवळ कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असून, सहा दवाखान्यांमध्ये हे लसीकरण होणार आहे़ शासनाकडून आज कोव्हिशिल्ड लसीचा पुरवठा न झाल्याने, आज महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावरील लसीकरण बंद राहणार आहे.