शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
3
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
4
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
7
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
8
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
9
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
10
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
11
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
12
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
13
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
14
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
15
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
16
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
17
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
18
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
19
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
20
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा

पुणे विभागाला अतिवृष्टीचा मोठा फटका; 87 हजार 416 हेक्टर पिकांच्या नुकसानीचा अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 9:19 PM

तब्बल 40 हजार लोकांना विभागात करावे लागले स्थलांतरीत 

ठळक मुद्दे8 व्यक्ती दगावल्या, 31 हजार घरांची पडझड,  1021 जनावरे मयत

पुणेपुणे विभागात बुधवार (दि.14) रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 87 हजार 416 हेक्टर वरील शेत पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला आहे. यामध्ये सर्वाधिक 58 हजार पेक्षा अधिक क्षेत्र एकट्या सोलापूर जिल्ह्यातील तर पुणे जिल्ह्यात 18 हजार 746 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय 8 व्यक्ती मयत झाल्या असून,  तब्बल 1 हजार 21 जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत. या अतिवृष्टीमुळे घरांचे मोठे नुकसान झाले असून,  तब्बल 3 हजार 156 घरांची पडझड झाली असून,  100 झोपड्या देखील पडल्या आहेत. 

राज्यासह पुणे विभागात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. याचा फार मोठा फटका पुणे विभागातील सोलापूर, पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्याला बसला आहे. बुधवारी (दि 14) रोजी विभागात मुसळधार पाऊस झाला. यात तब्बल 16 तालुक्यात एका दिवसात शंभर मि.मी पेक्षा अधिक पाऊस झाला. तर पावसाचे पाणी घरांमध्ये शिरल्याने 40 हजार 36 लोकांना स्थलांतरीत करावे लागले. या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील 4, सांगली जिल्ह्यात 3 आणि पुणे जिल्ह्यात एक व्यक्ती मयत झाली. जीवत हानी सोबतच जनावरांना देखील पावसाचा फटका बसला आहे. यात सोलापूर जिल्ह्यात 829 व पुणे जिल्ह्यात 153 जनावरे वाहून गेली आहेत. ---- अतिवृष्टीमुळे पुणे विभागात झालेल्या नुकसानीची जिल्हानिहाय माहिती जिल्हा       हेक्टर क्षेत्र       घरांची पडझड     मयत जनावरे पुणे           18,746            265                    153सातारा        1,420            267                    11सांगली        8,276            365                     28सोलापूर       58,581          2,256               829कोल्हापूर     393               03                     0एकूण         87146           3156                 1029

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवार