तालुक्यात २४४ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. यापूर्वी १० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून ८० ग्रामपंचायत गावांची निवडणूक होणार आहे. ४९५ जागेसाठी ११०४ उमेदवार रिंगणात आहे. ३१६ जागा बिनविरोध झाल्या आहेत. ७ जागा रिक्त आहेत. २४४ मतदान केंद्र असून एकून मतदार संख्या १ लाख ४८ हजार ११९ आहे. त्यापैकी पुरुष मतदार ७७ हजार २१४ आहेत, तर स्त्री मतदार संख्या ७० हजार ११२ आहे. पोस्टल मतदान ११२ झाले आहे. २४४ ईव्हीएम मशीनचा मतदानासाठी वापर होणार आहे. ४० ईव्हीएम मशीन राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रावर १२२० अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक केली आहे. मतदान साहित्य व अधिकारी व कर्मचारी यांना मतदान केंद्रावर ने -आण करण्यासाठी ३४ एसटी बसेसची सोय करण्यात आली आहे. दि. १४ रोजी मतदान केंद्रावर साहित्यासह कर्मचारी रवाना होणार आहे. नागरिकांनी निर्भय व नि:पक्षपणे मतदान करावे, असे आवाहन तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी केले आहे.
खेड तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 4:09 AM