इंदापूर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आढावा बैठक शुक्रवार (दि.२१) रोजी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना प्रांताधिकारी कांबळे यांनी माहिती दिली. कांबळे म्हणाले की, इंदापूर तालुक्यामध्ये जी बाल रुग्णालय उपलब्ध आहेत, त्यांच्यामध्ये असणाऱ्या सुविधा याची प्राथमिक स्तरावर माहिती संकलित करीत आहोत. यामध्ये ऑक्सिजन बेड, विचार करा की तुम्ही साधे बेड याची काय स्थिती आहे, हे जाणून घेत आहोत. यानुसार आराखडा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामध्ये उपलब्ध असणाऱ्या सेवा सुविधा व आणखी अधिक प्रमाणात काय सुविधा देता येतील याचा परिपूर्ण अभ्यास करून तयारी सुरू आहे.
लहान मुलांसाठी जी औषधे उपलब्ध नसतील त्यांची मागणी करीत आहोत. सर्व उपचार तालुक्यामध्ये उपलब्ध व्हावेत यासाठी सर्व लागणारी साधनेदेखील उपलब्ध केली जाणार आहेत. काही बालकांना त्रास जाणवू लागला तर पालकांनी शासकीय रुग्णालयात किंवा कोणत्याही आरोग्य रुग्णालयात तत्काळ संपर्क साधून बालकांवर उपचार करून घेणे गरजेचे आहे. या संदर्भात कुटुंबाने किंवा पालकांनी कोणतीही भीती न बाळगता आपल्या बालकांना काही आरोग्याच्या अडचणी असतील तर, तपासणी करून घ्यावी असे आवाहन बारामती उपविभागाचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.
इंदापूर तालुक्यातील आपल्या उपविभागातील गावात बालकांवर वाईट परिस्थिती येऊ नये यासाठी शासन खबरदारी घेत आहे. पालकांनीदेखील अधिकची खबरदारी घेऊन मुलांची काळजी घ्यावी.
-उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे
इंदापूर तालुक्यात (२१ मे) रोजी शहरी व ग्रामीण भागात १७३ बाधीत सापडले असून ठणठणीत बरे झालेले रुग्ण १४८ घरी सोडण्यात आलेले आहेत तर ७ रुग्णांचा मृत्यू उपचारादरम्यान झाला आहे, अशी माहिती इंदापूरचे तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी दिली.