शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 1:56 AM

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात ३७९ मतदान केंद्रे; ३,१६,४३६ मतदार

दावडी : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून, शिरूर लोकसभा अंतर्गत येणाऱ्या खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात मतदारांच्या सोयीसाठी ३७९ मतदान केंदे्र तयार करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी तालुक्यातील ३ लाख १६ हजार ४३६ मतदार मतदानाचा हक्क बजविणार आहे.२९ एप्रिल रोजी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे मतदान होत आहे. त्या अनुषंगाने खेड तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेची राजगुरुनगर येथे बैठक घेऊन निवडणूक प्रक्रियेतील नेमण्यात आलेल्या विविध पथक प्रमुख अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. मतदार याद्या मतदानापूर्वी दहा दिवस अगोदर अद्ययावत होणार आहे.तालुक्यात कोणतेही मतदान केंद्र संवेदनशील नसून मतदारांना ३७७ बीएलओमार्फत मतदानाच्या पाच दिवस अगोदर व्होटर स्लिपांचे वाटप होणार आहे.दिव्यांग मतदार संख्या ९०७ आहे.मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी केंद्रांवर पोहोचवण्याची व्यवस्था क्षेत्रीय अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. तालुक्यात १५ मतदान केंद्रे परिसरात मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे अशा ठिकाणी संपर्कासाठी स्वंतत्र कर्मचारी नेमण्यात येणार असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय तेली यांनी सांगितले.खेड तालुक्यातील लोकसभा निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी स्वंतत्र आचारसंहिता कक्ष सुरू करण्यात आला असून सभा, रॅली, पदयात्रा, लाऊड स्पीकर आदि परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा सुरू केली जाणार असून, निवडणूक आयोगाने तयार केलेल्या सुविधा नावाच्या अ‍ॅपवरून आॅनलाइन पद्धतीने परवानग्या दिल्या जाणार आहेत. निवडणूक आयोगाने प्रकाशित केलेल्या सिव्हिजल अ‍ॅपद्वारे मतदार अथवा नागरिकांनी निवडणूक आचारसंहिता काळातील येणाºया तक्रारींचे निराकारण नेमण्यात आलेल्या भरारी पथकामार्फत केले जाणार आहे.तालुक्यात तीन स्थिर पथके, तीन भरारी पथके, तीन व्हिडीओ पथके आणि एक निवडणूक खर्चाविषयक पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ३३ क्षेत्रीय व झोनल अधिकारी यांच्या मार्फत संपूर्ण मतदान केंद्रे तपासणी करून लक्ष ठेवण्याबरोबर सोयी-सुविधा पुरवल्या जाणार आहेत. अशी माहिती अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुचित्रा आमले यांनी दिली. मतदानाला नियुक्त कर्मचारी आणि मतदानाच्या साहित्याचे वाटप राजगुरुनगर येथे तालुका क्रीडा संकुलातून होणार असून वाहतुकीसाठी ६२ एसटीबसेस, १७ खासगी जीपची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि व्हीव्ही पॅट मशिन प्रशिक्षण राजगुरुनगर येथे देण्याची व्यवस्था करण्यात आली. मतदानासाठी नेमलेल्या कर्मचारी यांना आयोगाच्या सूचनेनुसार टपाली मतपत्रिकेची सुविधा दिली जाणार आहे.व्हीपॅट मशिनचा वापरआचारसंहिता काळात जास्तीत मतदानासाठी आणि प्रथमच ईव्हीएम मशिनबरोबरच आपले मत संबंधित उमेदवाराला मिळते का, हे पहाण्याची सुविधा व्हीपॅट मशिनद्वारे मतदारांनी मतदान केल्यानंतर पाहावयास मिळणार आहे. याची मतदारांना जनजागृती करण्यासाठी पथके तयार करण्यात येणार आहे. आचारसंहितेची काटेकोर अमंलबजावणी करण्यासाठी पथके नेमली असून नागरिकांनी याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत संजय तेली यांनी केले आहे.खेड तालुक्यात एकूण ३७९ मतदान केंदे्र आहे. २००० कर्मचारी वर्गाची नियुक्ती केली जाणार आहे.३ लाख १६ हजार ४३६ मतदारांची संख्या असून पैकी १ लाख ५१ हजार १०६ स्त्रिया, तर १ लाख ६५ हजार ३३० पुरुष मतदार आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक