लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या आठवड्यात १९ हजार ८२८ ने घट झाली. तसेच काेरोना बाधीतांच्या मृत्यूंच्या संख्येतही ५४ ने घट झाली. दुसरी लाटेची तीव्रता कमी होत असली तरी तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा प्रशासनातर्फे आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. पुणे, पिंपरी तसेच ग्रामीण भागात ऑक्सिजन खाटा, रूग्णालये, तसेच लहान मुलांवरील उपचार करण्याठाी बालरोगतज्ज्ञ आणि वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक तयार ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याची स्थिती आहे. गेल्या आठवड्यापासून रुग्णवाढीवा वेग मंदावला आहे. रुग्णालयांवरील ताणही यामुळे कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्याची तयारी केली आहे. यासाठी लहान मुलांकरीता एनआयसीयू आणि पीआयसीयू सोबत स्वतंत्र खाटांचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. ऑक्सिजन खाटा आणि व्हेंटिलेटर्सची संख्या वाढवण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेत ७ डेडिकेटेड कोविड हेल्थसेंटर तर ४ डीसीएची केंद्र तयार करण्यात आले आहे. २ हजार २८७ खाटांची या केंद्राची क्षमता आहे. तर १ हजार ७०७ खाटा या ऑक्सिजनच्या तर ३७ खाटा ऑक्सिजन विरहीत आहेत. येरवडा येथील स्व. राजीव गांधी रूग्णालयात लहान मुलांसाठी २०० खाटांचे स्वतंत्र कक्षाचे नियोजन आहे. त्यात नवजा तसेच कुमार वयाच्या बालकांसाठी आसोलेशन सेंटर ऑक्सिजन खाटा, एनआयसीयू, पीआयसीयू तसेच तपासणी केंद्र तयार करण्यात येणार आहे. या सोबतच पालकांना राहण्याची साेयही या ठिकाणी करण्यात येणार आहे. खासगी रूग्णालयेसुद्धा अधिग्रहीत करण्यात आलीआहे. त्यातील एकुण ५ हजार ३५९ ऑक्सिजन खाटा तर १ हजार ९०७ ऑक्सिजन विरहीत खाटा ठेवण्यात आल्या आहेत. ५८५ ऑक्सिजन व्हेंटिलेटर्स आणि ४५६ आयसीयू बेड उपलब्ध करून देण्यात आले आहे.
चौकट
ग्रामीण भागात लहान मुलांसाठी आयसीयू, पीआयसीयू
ग्रामीण भागात काशीबाई नवले रुग्णालयात लहान मुलांकरीता ४० खाटा रखीव ठेवण्यात आल्या आहेत. यातील २० ऑक्सिजन खाटा तर २० ऑक्सिजन विरहीत खाटा आहेत. तसेच १० खाटांची क्षमता असलेल्या आयसीयूची तयार करण्यात येत आहे. आैंध जिल्हा रूग्णालयात ३० खाटा लहान मुलांकरीता राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यात १८ ऑक्सिजन खाटा तर १० पीआयसीयू खाटा तर २ व्हेंटिलेटर ठेवण्यात आले आहे. बारामती शासकीय महाविद्यालयात १८ ऑक्सिजन खाटा, १० पीआयसीयू खाटा तर दोन व्हेंटिलेटर सज्ज ठेवण्यात आले आहे. तळेगाव दाभाडे येथे २० खाटा आणि ४ खाटांचे आयसीयू उभारण्यात येत आहेत. अवसरीत उभारण्यात येणाऱ्या जंम्बो कोविड केअर सेंटरमध्ये लहान मुलांसाठी १८ ऑक्सिजन खाटा, १० पीआयसीयू तर दोन व्हेंटिलेटर उपलबद्ध करून देण्यात आले आहे. तर भीगवण, रूई, पाबळ, शिक्रापूर येथे कोविड केअर हेल्थ सेंटर उभारण्यात येणार आहेत.
चौकट
पिंपरी चिंचवड तयारी
वायसीएम हॉस्पिटल येथे १५० ते २०० खाटा लहान मुलांकरीता राखीव. नवीन जिजामाता रूग्णालयात १०० ऑक्सिजन खाटा राखीव. म्हासुळकर कॉलनी येथे ५० खाटाचा तर पिंपरी वाघेरे येथील म्हाडा इमारातीमध्ये लहान मुलांकरिता १०० खाटंचे कोविड केअरर सेंटर प्रस्तावित. बालरोग तज्ज्ञ, निवासी डॅक्टर्स नर्सेड यांची उपलब्धता. सीएसआरच्या माध्यमातून व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.