विसर्जन मिरवणुकीसाठी केली जय्यत तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 01:32 AM2018-09-22T01:32:39+5:302018-09-22T01:32:54+5:30

विसर्जन घाटांवर अग्निशामक दलाचे कर्मचारी नियुक्त करणे, मिरवणुकीच्या मार्गावर ध्वनिक्षेपनाची व प्रकाशाची व्यवस्था करणे, मोबाईल टॉयलेट आदी सर्व तयारी केली आहे.

Preparedness for the Immersion Process | विसर्जन मिरवणुकीसाठी केली जय्यत तयारी

विसर्जन मिरवणुकीसाठी केली जय्यत तयारी

Next

पुणे : यंदाच्या वर्षी गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती, विर्सजन मार्गावर औषधफवारणी, गु्रप स्वीपिंग, कंटेनर, निर्माल्य कलश, कीटकनाशक फवारणी, विसर्जन घाटांवर अग्निशामक दलाचे कर्मचारी नियुक्त करणे, मिरवणुकीच्या मार्गावर ध्वनिक्षेपनाची व प्रकाशाची व्यवस्था करणे, मोबाईल टॉयलेट आदी सर्व तयारी केली आहे.
शहरामध्ये दर वर्षी गणेशोत्सवात तब्बल ६ ते ७ लाख गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. यासाठी पालिकेच्या वतीने विविध ठिकाणी मूर्ती विसर्जनासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. यात विविध भागांत नदीकाठावर विसर्जन घाटांवर जीवरक्षकांची नियुक्ती, विसर्जन हौद, लोखंडी टाक्यांची सोय करण्यात आली आहे. शहरात प्रामुख्याने संगम घाट, वृद्धेश्वर घाट, अष्टभुजा मंदिर, बापू घाट, विठ्ठल मंदिर, ठोसरपागा घाट, राजाराम पूल घाट, चिमा उद्यान येरवडा, वारजे-कर्वेनगर आदी ठिकाणी नदीपात्रात विर्सजन घाटांची तयारी केली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने डेक्कन जिमखाना (नटराज टॉकीजजवळ) व नूतन मराठी विद्यालयाजवळ लक्ष्मी रस्ता येथे मिरवणूक संपेपर्यंत उपचारांकरिता वैद्यकीय पथक नियुक्ती केले आहे.
>नागरिकांनी काळजी घ्यावी
सध्या शहरामध्ये सर्दी, खोकला, ताप या आजारांची साथ सुरू आहे. त्यामुळे शक्यतो गर्दीत जाणे टाळावे, मिरवणुकीत गुलालाचा वापर करणे टाळावे, रस्त्यावरील अन्न खाताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
>स्वागत मंडपांना यंदा परवानगी नाही
गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीसाठी शहरात विविध रस्त्यांवर काही संस्थांच्या वतीने स्वागत मंडप टाकण्यात येतात. यंदा न्यायालयाच्या अदेशामुळे पालिका वगळता अन्य कोणत्याही संस्था अथवा खासगी व्यक्तींना रस्त्यांवर स्वागत मंडप टाकण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले.
>पिपाण्यांवर बंदी
दर वर्षी विसर्जन मिरवणुकीत रस्त्यांवर किरकोळ विक्रेत्यांकडून
मोठ्या प्रमाणात विचित्र आवजाच्या विविध प्रकारच्या पिपाण्यांची विक्री केली जाते. नागरिकांकडून विशेषत: युवकांच्या गु्रपकडून पिपाण्या वाजवतच सर्वत्र संचार केला जातो. याचा प्रचंड त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतो. यामुळे पिपाण्यांची विक्री करणारे व वाजवणारे यांच्यावर महापालिकेच्या वतीने पोलिसांच्या सहकार्याने कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, रस्त्यावर किरकोळ विक्री करणाºया
विक्रेत्यांवरदेखील कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले.

Web Title: Preparedness for the Immersion Process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.