शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

विसर्जन मिरवणुकीसाठी केली जय्यत तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 1:32 AM

विसर्जन घाटांवर अग्निशामक दलाचे कर्मचारी नियुक्त करणे, मिरवणुकीच्या मार्गावर ध्वनिक्षेपनाची व प्रकाशाची व्यवस्था करणे, मोबाईल टॉयलेट आदी सर्व तयारी केली आहे.

पुणे : यंदाच्या वर्षी गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती, विर्सजन मार्गावर औषधफवारणी, गु्रप स्वीपिंग, कंटेनर, निर्माल्य कलश, कीटकनाशक फवारणी, विसर्जन घाटांवर अग्निशामक दलाचे कर्मचारी नियुक्त करणे, मिरवणुकीच्या मार्गावर ध्वनिक्षेपनाची व प्रकाशाची व्यवस्था करणे, मोबाईल टॉयलेट आदी सर्व तयारी केली आहे.शहरामध्ये दर वर्षी गणेशोत्सवात तब्बल ६ ते ७ लाख गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. यासाठी पालिकेच्या वतीने विविध ठिकाणी मूर्ती विसर्जनासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. यात विविध भागांत नदीकाठावर विसर्जन घाटांवर जीवरक्षकांची नियुक्ती, विसर्जन हौद, लोखंडी टाक्यांची सोय करण्यात आली आहे. शहरात प्रामुख्याने संगम घाट, वृद्धेश्वर घाट, अष्टभुजा मंदिर, बापू घाट, विठ्ठल मंदिर, ठोसरपागा घाट, राजाराम पूल घाट, चिमा उद्यान येरवडा, वारजे-कर्वेनगर आदी ठिकाणी नदीपात्रात विर्सजन घाटांची तयारी केली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने डेक्कन जिमखाना (नटराज टॉकीजजवळ) व नूतन मराठी विद्यालयाजवळ लक्ष्मी रस्ता येथे मिरवणूक संपेपर्यंत उपचारांकरिता वैद्यकीय पथक नियुक्ती केले आहे.>नागरिकांनी काळजी घ्यावीसध्या शहरामध्ये सर्दी, खोकला, ताप या आजारांची साथ सुरू आहे. त्यामुळे शक्यतो गर्दीत जाणे टाळावे, मिरवणुकीत गुलालाचा वापर करणे टाळावे, रस्त्यावरील अन्न खाताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.>स्वागत मंडपांना यंदा परवानगी नाहीगणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीसाठी शहरात विविध रस्त्यांवर काही संस्थांच्या वतीने स्वागत मंडप टाकण्यात येतात. यंदा न्यायालयाच्या अदेशामुळे पालिका वगळता अन्य कोणत्याही संस्था अथवा खासगी व्यक्तींना रस्त्यांवर स्वागत मंडप टाकण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले.>पिपाण्यांवर बंदीदर वर्षी विसर्जन मिरवणुकीत रस्त्यांवर किरकोळ विक्रेत्यांकडूनमोठ्या प्रमाणात विचित्र आवजाच्या विविध प्रकारच्या पिपाण्यांची विक्री केली जाते. नागरिकांकडून विशेषत: युवकांच्या गु्रपकडून पिपाण्या वाजवतच सर्वत्र संचार केला जातो. याचा प्रचंड त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतो. यामुळे पिपाण्यांची विक्री करणारे व वाजवणारे यांच्यावर महापालिकेच्या वतीने पोलिसांच्या सहकार्याने कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, रस्त्यावर किरकोळ विक्री करणाºयाविक्रेत्यांवरदेखील कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८