पुणे : जिल्हातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांचे, धरणांचे किंवा केंद्रीय संस्थांची ड्रोन कॅमेºयाच्या माध्यमातून टेहळणी करून त्याचा दहशतवादी कारवायांसाठी उपयोग केला जाऊ शकतो. त्यामुळे ड्रोन कॅमेºयाच्या वापरापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधित पोलीस ठाण्याची ७ दिवस आधी परवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगीशिवाय ड्रोनचा वापर केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.गणेशोत्सवाच्या पर्श्वभूमीवर गणेश मंडळांकडून किंवा काही खासगी संस्थांकडून छायाचित्रणासाठी ड्रोन कॅमेºयाचा वापर केला जाऊ शकतो. मात्र, महत्त्वाच्या वास्तू, धार्मिक स्थळे तसेच केंद्र्रीय संस्था शहराच्या मध्यवर्ती भागात आहेत. त्यामुळे सुरक्षितता आणि खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाकडून ‘पुणे जिल्हा ग्रामीण फौजदारी संहिता १९७३’च्या कलम १४४ नुसार प्रतिबंध आदेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा व्यावसायिकांना ड्रोन कॅमेरा वापरण्यापूर्वी ७ दिवस परिसरातील पोलीस ठाण्याकडून पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे.गणेश मंडळांकडून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ड्रोन कॅमेºयांचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी ७ दिवस आधी परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबत पोलीस प्रशासनाला लेखी आदेश देण्यात आले आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ड्रोन कॅमेरे वापरण्यापूर्वी लेखी अर्ज स्वीकारून ते सर्व छाननी करून पोलीस आयुक्तालयाकडे पाठविले जातात. परंतु, संबंधितांनी स्थानिक पोलीस ठाण्यातून ७ दिवस आधी परवानगी घेणे बंधनकारक आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास दोषींवर कारवाई केली जाईल.- राजेंद्र मुठे, निवासी उपजिल्हाधिकारी
ड्रोनच्या वापरासाठी पूर्वपरवानगी बंधनकारक, अन्यथा कारवाईचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 6:13 AM