--
इंदापूर : महाराष्ट्र राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये धनगर समाजाचा आरक्षण प्रश्न सभागृहात उपस्थित करावा, अशी मागणी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य धनगर ऐक्य परिषदेचे समन्वयक डॉ. शशिकांत तरंगे यांनी केली आहे. याबाबत राज्यमंत्री भरणे यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, धनगर समाज गेली ७० वर्षे आपली मागणी सरकार दरबारी मांडत आहे. परंतु सरकार त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. आम्ही सर्व आपल्या मतदार संघातील धनगर समाज बांधव आपल्याकडे विनंती करतो की, सरकारने जरी धनगर समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले असेल, तरी आपण आमचे लोकप्रतिनिधी म्हणून धनगर समाजाच्या मागण्या आपण स्वतः अधिवेशनात उपस्थित कराव्यात.
पुढील मागण्या महाराष्ट्र राज्य धनगर ऐक्य परिषदेच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
धनगर समाजाला एस. टी. आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा प्रश्न सभागृहात उपस्थित करावा, जे आदिवासी समाजाला ते धनगर समाजाला त्या सर्व योजना व मागील १ हजार कोटी व चालू आर्थिक वर्षाचे १ हजार कोटी असे एकूण २ हजार कोटी धनगर समाजासाठी त्वरित उपलब्ध करून घ्यावेत, आमदार निधीतून किंवा आपल्या सहकार्यातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, यशवंतराव होळकर यांचे भव्य स्मारक आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये उभे करण्यात यावे ही संपूर्ण धनगर समाज बांधव आपल्याकडे एकमुखी मागणी करीत आहेत.
--
फोटो क्रमांक : २९ इंदापूर धनगर निवेदन
फोटो ओळ : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन देताना डॉ. शशिकांत तरंगे व धनगर समाजाचे कार्यकर्ते.
===Photopath===
290621\29pun_8_29062021_6.jpg
===Caption===
फोटो क्रमांक : २९ इंदापूर धनगर निवेदनफोटो ओळ : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन देताना डॉ. शशिकांत तरंगे व मान्यवर