नम्रता फडणीस पुणे : आदिवासी व्यक्ती म्हणजे अंगाखांद्यावर वस्त्र नसलेली अशी भूकी कंगाल जमात... त्यांच्या जमिनी लाटून त्याच्यावर धरण बांधण्याचे शासनाचे सुरू असलेले प्रयत्न आणि पुनर्वसनाच्या नावाखाली त्यांची झालेली फसवणूक हा प्रसिद्ध नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या ‘व्याकरण’ या पुस्तकाचा ज्वलंत विषय. आठ वर्षांपूर्वी ‘व्याकरण’ हे मूळ नाव बदलून ‘डॅम इट अनू गोरे’ या नावाचे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आले होते. या नाटकाला काही प्रमाणात विरोधही झाला. काही प्रयोगानंतर हे नाटक बंद झाले. इतक्या वर्षांपासून हे नाटक मराठी रंगभूमीला पोरके असले तरी हिंदी रंगकर्मींना या विषयाने खुणावले आहे. भातखंडे ललितकला शिक्षा समिती, रायपूरच्या वतीने रंग श्रृंखला नाट्य मंचाकडून ‘व्याकरण’ या नाटकाचे पहिल्यांदाच २८ एप्रिल रोजी हिंदी रंगभूमीवर सादरीकरण होणार आहे.सह्याद्रीच्या खोऱ्यात सह्याद्री जल प्रकल्प उभारण्याचे केंद्र सरकार जाहीर करते. सुरुवातीला हा प्रकल्प पूर्ण करण्याचे काम भारतीय कंपनी करणार असते. नंतर हे काम कसे अमेरिकन कंपनीला दिले जाते. या धरणासोबत भारतातील सर्व नद्या कालवे काढून एकमेकांना जोडल्या जाणारअसतात. त्यामुळे एखाद्या भागात पाऊस पडला नाही तर या कालव्यातून पाणीग्रस्त भागाला पाणी पोहोचविता येईल, असा त्याचा हेतू आहे. मात्र अनू गोरे ही व्यक्ती त्याला कशा पद्धतीने विरोध करते. अदिवासींच्या पाठीमागे ती कशी ठामपणे उभी राहाते. मग पुढे खटला... अनूला देशद्रोही ठरविण्यामागचं षड्यंत्र असा नाटकाचा विषय आहे.वीस प्रयोगांनंतर नाटक बंद१ मराठी व्यावसायिक रंगभूमीवर अजित भुरे यांनी ‘डॅम इट अनु गोरे’ या नावाने नाटक रंगभूमीवर आणले होते. शीतल क्षीरसागर ही प्रमुख भूमिकेत होती. हे नाटक जेव्हा आले तेव्हा काही जणांनी यानाटकाला विरोध दर्शविला होता. ‘निषेध निषेध’ म्हणून विषय नाकारला होता.२ जवळपास नाटकाचे २० प्रयोग झाले; मात्र, नंतर नाटकालाबुकिंग मिळणे बंद झाल्याने नाटकाचे प्रयोग थांबवावे लागले असल्याची माहिती प्रेमानंद गज्वी यांनी दिली.
हिंदी रंगभूमीवर ‘डॅम इट अनू गोरे’चे सादरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 4:04 AM