शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

जिल्ह्याच्या १० वर्षांचे ‘व्हिजन’ नीती आयोगाकडे सादर

By admin | Published: June 01, 2017 1:46 AM

राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचे पुढील १० वर्षांचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ करण्याच्या सूचना नीती आयोगाने केल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचे पुढील १० वर्षांचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ करण्याच्या सूचना नीती आयोगाने केल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचे हे आराखडे नीती आयोगाकडे सादर करण्यात आल्याचे ग्रामपंचायत विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील १ हजार ४०७ ग्रामपंचायती असून त्याचे हे व्हिजन डॉक्युमेंट पाठविण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आदेशानुसार नीती आयोगाने हे आराखडे मागविले होते. दहा वर्षांचे हे विकास आराखडे केले असून त्यात तीन वर्षांचा कृती आराखडा आणि सात वर्षांचा रणनीती आराखडा तयार केला आहे. यामध्ये ६९७ ग्रामंपचायतींनी शिक्षणासाठी, आरोग्य व स्वच्छतेसाठी ३४१ ग्रामपंचायतींनी, पायाभूत सुविधांसाठी १८९ ग्रामपंचायतींनी, रोजगारासाठी १४४ ग्रामपंचायतींनी व इतर ३५ ग्रामपंचायतींनी इतर बाबींसाठी ठराव केला आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शाळा नाहीत. विद्यार्थ्यांना पाच ते दहा किमी शिक्षणासाठी जावे लागते. यामुळे ग्रामपंचायतीने शिक्षणाला पहिले स्थान देण्यात आले आहे. या प्रमाणात अद्याप गावातील कचरा गावामध्ये जिरवण्याची सुविधा नाही. यामुळे गावातील मोकळ्या जागेमध्ये कचरा साचतो. गावकऱ्यांना स्वच्छ पाणी मिळत नसल्याने कचरा आणि पाण्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. गावापासून प्राथमिक आरोग्य केंद्र लांब असते. त्यामुळे उपचार मिळेपर्यंत अनेकांना जीव गमवावा लागतो. अशा विविध कारणांमुळे ग्रामपंचायतींनी आरोग्य-स्वच्छतेला दुसरे स्थान दिले आहे. पायाभूत सुविधा, रोजगार सुविधेला अनुक्रमे तृतीय, चतुर्थ स्थान दिले़