पुणे : पुणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी यांनी गुरूवार (दि.१७) रोजी सन २०१९-२० सा अर्थिक वर्षाचे ६ हजार ८२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समिती समोर सादर केले. गेल्या वर्षीपेक्षा या अंदाजपत्रकामध्ये तब्बल ६८८ कोटींची वाढ करण्यात आली आहे. गतवर्षी तत्कालीन महापालिका आयुक्तांनी प्रशासनाच्या वतीने ५ हजार ३९७ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. महापालिका आयुक्तानी अंदाजपत्रक सादर करताना उत्पन्न वाढीवर भर दिला आहे . त्यामुळे यंदाच्या चालू आर्थिक वर्षी तब्बल ६ हजार ८२ कोटींचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. - अंदाजपत्रकातील ठळक मुद्दे : - संकल्प ते सिध्दी” चळवळीसाठी विशिष्ट योजनांवर लक्ष केंद्रीत
- १० लाख पेक्षा सर्व कामाचा सामाजिक परिणाम काय होणार तपासणार.
- उत्पन्न वाढीनंतर भर देणार
- २४ बाय ७ समान पाणी पुरवठा येजनेला गती देणार.
- भामा आसखेड योजना आॅक्टोबर २०१९ अखेर पर्यंत पूर्ण करणार.पुनर्वसनासाठी अंदाजपत्रकात तरतुद
- कात्रज तलावांचे प्रदुषण रोखणार
- घनकचरा व्यवस्थापनसाठी ५४६ कोटींची तरतुदी.
- जानेवारी २०२० नंतर शंभर टक्के कच-यावर प्रक्रिया करणार
- अंदाजपत्रकात प्रथमच आयुक्ताकडून नगरसेवकांच्या वर्गीकरणाला चाप लावला
- प्रशासनाच्या मंजुरीशिवाय परस्पर ठरावाद्वारे वर्गीकरण करू असे केले स्पष्ट
- शिवणे - खराडी रस्त्यासाठी ३१.६० कोटींची तरतुद
- आयुक्काकडून पुणेकरांवर करवाढीचा बोजा - मिळकतकरामध्ये १२ टक्के , तर पाणीपट्टीत १५ टक्के कर वाढ