पुणे : “वि. स. खांडेकर यांनी आपल्या साहित्यातून कायम आदर्शवादाची जोपासना केली,” अशा शब्दांत ४५ व्या पुण्यतिथीनिमित्त साहित्यप्रेमींनी त्यांचे स्मरण केले.
साहित्य परिषद व कथा भारती यांनी वि. स. खांडेकर चौकात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. खांडेकर स्मारकाजवळ त्यांच्या साहित्य ग्रंथाचे पूजन नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे व प्राचार्य श्याम भुर्के यांच्या हस्ते झाले.
भुर्के म्हणाले, ग्रामीण भागात ज्ञानदानाचे कार्य करताना खांडेकरांनी सर्वसामान्यांची दु:खे जाणून घेतली. त्यामुळे त्यांचे मन अस्वस्थ झाले. ती अस्वस्थता त्यांनी साहित्य निर्मितीतून वाचकांपर्यंत पोहोचवली. अमला फाटक यांनी स्वागत केले. सुधाकर जोशी यांनी प्रास्ताविक केले. गीता भुर्के यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. डॉ. अनुजा कुलकर्णी यांनी आभार व्यक्त केले. संजय भगत, डॉ. अरविंद नवरे, बाबा ठाकूर, माधवी केसकर, नीला सरपोतदार, रूपाली वैद्य उपस्थित होते.